परदेशी पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान धोक्यात-अभयारण्याची अधिसूचना प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 09:19 PM2019-02-02T21:19:47+5:302019-02-02T21:20:58+5:30

पांढऱ्या रंगाच्या-अग्निपंखांच्या फ्लेमिंगोसह काही डझन परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणाºया मायणी पक्षी अभयारण्याची अंतिम अधिसूचना अद्याप निघालेली नाही. मायणीसह जवळच असलेल्या येराळवाडी तलावाकडे दुर्लक्ष होत

External Fowler's Shelter awaiting notification of danger-sanctuary | परदेशी पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान धोक्यात-अभयारण्याची अधिसूचना प्रतीक्षेत

परदेशी पाणपक्ष्यांचे आश्रयस्थान धोक्यात-अभयारण्याची अधिसूचना प्रतीक्षेत

googlenewsNext
ठळक मुद्देमायणीकडे परदेशी पक्ष्यांनी फिरवली पाठ; अन्नसाखळी नष्ट

प्रगती जाधव-पाटील।
सातारा : पांढऱ्या रंगाच्या-अग्निपंखांच्या फ्लेमिंगोसह काही डझन परदेशी पाहुण्यांचा अधिवास असणाºया मायणी पक्षी अभयारण्याची अंतिम अधिसूचना अद्याप निघालेली नाही. मायणीसह जवळच असलेल्या येराळवाडी तलावाकडे दुर्लक्ष होत असून, मानवी हस्तक्षेपामुळे देशी-विदेशी स्थलांतरित पक्ष्यांची ही आश्रयस्थाने इतिहासजमा होण्याची भीती आहे. मायणी तलावाकडे गेल्या काही वर्षांत या पक्ष्यांनी फिरवलेली पाठ ही धोक्याची घंटा ठरली आहे.

दि. २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ (वेटलँड डे) दिन म्हणून साजरा केला जातो. अतिशित प्रदेशातून हिवाळ्यात भारतात स्थलांतरित होणाºया पाणपक्ष्यांचा अधिवास असलेले मायणी व येराळवाडी तलाव परिसर संरक्षित करण्याची आवश्यकता आहे. शनिवारी साजºया होणाºया जागतिक पाणथळ दिनाच्या निमित्ताने शासनाने या दोन्ही तलावांकडे लक्ष देऊन त्यांचा ºहास थांबवावा. २५ वर्षांपूर्वी घोषणा केलेल्या अभयारण्याची अंतिम अधिसूचना अद्याप न निघाल्याने तेथील मानवी हस्तक्षेप रोखून पक्ष्यांचा अधिवास जपण्याची गरज आहे. तसे न झाल्याने गेल्या काही वर्षांमध्ये मायणी तलावाकडे परदेशी पाहुण्यांनी पाठ फिरवली आहे.

मायणी तलावातील वाढत्या मानवी हस्तक्षेपाबाबत बोलताना साताºयातील ड्रोंगो या पर्यावरणप्रेमी संस्थेचे अध्यक्ष सुधीर सुकाळे म्हणाले, ‘मायणीत बेसुमार गाळाचे उत्खनन झाले. विटा व इतर कारणांसाठी या तलावातील गाळाची माती काढली गेली. वेडीबाभूळ व बेशरम या वनस्पतींच्या अतिक्रमणामुळे पक्ष्यांना बसण्यासाठी जागा कमी पडू लागली. उथळ पाण्यामध्ये उंचवट्यांवर सुरक्षित ठिकाणी हे पक्षी बसतात. उत्खननामुळे या पक्ष्यांची आश्रयस्थाने धोक्यात आली. त्यांची बेशरम वनस्पती व खोल पाण्यामुळे या पक्ष्यांची अन्नसाखळी धोक्यात आली. परिणामी असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने परदेशी पाणपक्ष्यांनी मायणीजवळ अनुकूल अधिवास शोधण्यास सुरुवात केली. मायणी तलावाप्रमाणे येराळवाडी तलावात होऊ पाहत असलेला मानवी हस्तक्षेप वेळीच रोखण्याची गरज आहे. त्यामुळे मायणीसह येराळवाडी हे दोन्ही तलाव परिसर पक्षी अभयारण्य म्हणून संरक्षित व्हावा.’

‘रामसर’ या पाणथळ पक्ष्यांचे सर्वेक्षण करणाºया संस्थेने मायणी पक्षी अभयारण्यावर शिक्कामोर्तब केला आहे. मात्र इंदिरा गांधींच्या नावाने जाहीर झालेल्या या पक्षी अभयारण्याची अंतिम अधिसूचना न निघाल्याने या अभयारण्याला कोणताही वैधानिक दर्जा नाही.

रशिया, सायबेरीया, युरोप देशांतून स्थलांतर
सातारा जिल्ह्यातील मायणी-येराळवाडी तलाव परिसर सध्या पाणपक्ष्यांनी बहरला आहे. हिवाळ्याचा मोसम हा या परदेशी पाहुण्यांचा जिल्ह्यात आगमन आणि रहिवासाचा काळ असतो. रशिया, सायबेरीया तसेच युरोपीय देशांतून हे पक्षी येथे स्थलांतर करतात. थंडी संपत आली की हे पाहुणे पुन्हा मायदेशी परततात. आपल्या देशात गेल्यानंतर ते प्रजनन करतात. या ठिकाणी फ्लेमिंगोसह, युरेशीयन डक, कॉमनकुट (वारकरी), पेन्टेड स्टार्क, नॉदर्न शावलर (थापट्या बदक), तसेच भारतीय पाणपक्ष्यांमध्ये अडई, टिबुकली, विविध करकोचे, शेराटी, पानकावळा, तुतारी, नदीसुरय यासह विविध प्रवासी पक्ष्यांचा अधिवास असतो.
 

मायणीसह येराळवाडी पक्षी अभयारण्य विकसित झाल्यास निसर्ग पर्यटनाचे एक वेगळे ठिकाण निर्माण होईल. त्यातून निर्माण होणाºया पक्षीनिरीक्षण पर्यटनातून स्थानिकांचा शाश्वत विकासात निश्चित हातभार लागेल.
- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा.

खटाव तालुक्यातील मायणी तलावात दरवर्षी परदेशी पक्षी येत असत; परंतु अलीकडील काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर गाळाचे उपसा केला जात असल्याने त्यांचे आश्रयस्थान धोक्यात आले आहे. साहजिकच त्यांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: External Fowler's Shelter awaiting notification of danger-sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.