कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:10 PM2018-11-28T23:10:35+5:302018-11-28T23:10:40+5:30
सातारा : कºहाड तालुक्यातील चार साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी मंगळवारी महसूलच्या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत हे पथक तपासणीत गुंतले ...
सातारा : कºहाड तालुक्यातील चार साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी मंगळवारी महसूलच्या पथकाने केली. रात्री उशिरापर्यंत हे पथक तपासणीत गुंतले होते; परंतु या तपासणीत काय निष्पन्न झाले, याबाबत कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. त्यातच कारवाई करण्याआधी गरजेची असणारी गोपनीयता मात्र पाळली जात नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या तपासणीवर बहिष्कार टाकला.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर काटामारी करून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून वारंवार केला जातो. या पार्श्वभूमीवर वजनकाटा तपासणीची उपविभागनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. प्रांताधिकाºयांच्या नेतृत्वाखाली असणाºया पथकात पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल या शासकीय कर्मचाºयांसह शेतकरी संघटनांचे प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे.
मंगळवारी कºहाड तालुक्यातील कृष्णा, सह्याद्री, रयत, जयवंत शुगर या कारखान्यांचे वजन काटे तपासण्यात आल्याची माहिती महसूलमधील सूत्रांनी दिली. ही कारवाई सकाळी नऊ वाजता सुरू झाली होती, ती रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती. मात्र, या तपासणीतून काय निष्पन्न झाले, हे मात्र समजू शकलेले नाही. गव्हाणीकडे गेलेले उसाचे ट्रॅक्टर, ऊसगाड्या, ट्रक परत बोलावून ते काट्यावरून नेण्यात आले. काट्यांची तपासणीही करण्यात आल्याची माहिती पथकातर्फे देण्यात आली. मात्र, कुठला कारखाना वजनकाट्यांमध्ये दोषी आढळला, याबाबत माहिती दिली नाही.
वजनकाट्यांची तपासणी करण्यापूर्वी गोपनीयता जरुरीचे आहे. ज्या कारखान्यांबाबत संघटनांनी तक्रारी केल्या, त्या कारखान्यांवर अचानकपणे तपासणी पथक धडकणे जरुरीचे आहे. मात्र तसे न करता तलाठी, कोतवालांसह संपूर्ण यंत्रणेला जागे करून करण्यात येणारी तपासणी म्हणजे केवळ फार्स असल्याची टीका स्वाभिमानीने केली आहे.
तपासणी हा केवळ फार्स..
कºहाड तालुक्यातील कारखान्यांच्या वजनकाट्यांची तपासणी मंगळवारी करण्यात आली. मात्र ही तपासणी केवळ फार्स आहे. वजनकाट्यांच्या धाडपथकाने गोपनीयता पाळून कारवाई केली नसल्याने या मोहिमेवर बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली.