राज्यात तिघाड अन् वाॅर्डात बिघाड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:35+5:302021-09-25T04:42:35+5:30

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थँच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार असल्याने सातारा पालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची झोपच उडाली आहे. अशा ...

Failure in three wards in the state! | राज्यात तिघाड अन् वाॅर्डात बिघाड!

राज्यात तिघाड अन् वाॅर्डात बिघाड!

Next

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थँच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार असल्याने सातारा पालिकेसाठी इच्छुक उमेदवारांची झोपच उडाली आहे. अशा इच्छुकांना आता राजकीय पक्ष व आघाड्याच तारणार असल्याने उमेदवारीसाठी त्यांना आणखीन मजबूत बांधणी करावी लागणार आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा विद्यमान नगरसेवकांवर फारसा प्रभाव पडणार नसला ,तरी काहींना आरक्षणाचा फटका मात्र निश्चित बसू शकतो.

सातारा अ वर्ग पालिका आहे. या पालिकेतील सत्ता समीकरणे, राजकीय घडामोडींकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले असते. सध्या पालिकेत खासदार उदयनराजे भोसले यांच्या आघाडीची सत्ता आहे. यंदाही पालिकेचा गड काबीज करण्यासाठी खासदारांची आघाडी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आह; तर विरोधकांनीदेखील कंबर कसली आहे. या सर्वांना शह देण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्या इच्छुक उमेदवारांना मात्र, बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा यंदाही फटका बसणार आहे.

इच्छुक उमेदवार कितीही सक्षम असला, जनमानसात त्याची प्रतिमा कितीही चांगली असली, त्याच्यात निवडून येण्याची क्षमता जरी असली तरी, राजकीय पक्ष व आघाड्यांपुढे त्याचा टिकाव लागणे अवघड आहे. असे उमेदवार निवडणुकीत एकतर पराभूत होतात किंवा निवडणुकीतून माघार घेतात. अशा उमेदवारांना केवळ राजकीय पक्ष व आघाड्याच तारू शकतात, मात्र, आरक्षणानंतरच हे चित्र स्पष्ट होऊ शकते.

राज्य निवडणूक आयोगाने अधिकाधिक तोडफोड न करता प्रभाग रचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. त्यामुळे सातारा पालिकेच्या विद्यमान नरसेवकांना बहुसदस्यीय पद्धतीचा मोठा फटका बसणार नाही. केवळ काठावरील प्रभागांमध्ये थोड्याफार प्रमाणात हद्दवाढीमुळे बदल होऊ शकतो. असे असले तरी आरक्षणाचा मात्र विद्यमान काही नगरसेवकांना फटका बसणार हे निश्चित मानले जात आहे.

(चौकट)

बहुसदस्यीयमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी

- एका प्रभागाचं प्रतिनिधीत्व दोन नगरसेवक

- दोघांमुळे विकासकामे करताना अडचणी

- हेवेदावे व श्रेयवादामुळे विकास खुंटतोय

- निधी मिळण्यास अडसर. काम कोणी करायचे यावरून वाद

- कामे होत नसल्याने मतदारांमध्ये असंतोष

- एक वाॅर्ड एक नगरसेवक असल्यास अशा अडचणी शक्यतो येत नाहीत.

(चौकट)

पालिकेतील सध्याची स्थिती

सातारा पालिकेची २०१६ ची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार झाली होती. पूर्वीचे ४० वाॅर्ड रद्द होऊन २० प्रभाग झाले. एका प्रभागात दोन असे ४० नगरसेवक या निवडणुकीत निवडून आले. सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी व भाजप अशा तीन आघाड्यांमध्ये निवडणुकीचा सामना रंगला. यामध्ये साविआने नगराध्यक्षपदासह २२, नविआने १२, तर भाजपच्या ६ नगरसेवकांनी निवडणुकीत विजय मिळविला.

जोड...

Web Title: Failure in three wards in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.