राज्यात तिघाड अन् वाॅर्डात बिघाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:37+5:302021-09-25T04:42:37+5:30
आता अशी असेल स्थिती राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पालिकेची आगामी निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच होणार आहे. शहराची हद्दवाढ झाल्याने ...
आता अशी असेल स्थिती
राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पालिकेची आगामी निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसारच होणार आहे. शहराची हद्दवाढ झाल्याने शाहूपुरी, विलासपूर, गोडोली, कोडोली, खेड येथील काही भाग पालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे यंदा २० ऐवजी २४ प्रभाग पडू शकतात. वाढीव भागातून ८ नगरसेवक वाढणार असल्याने ही संख्या देखील ४० वरून ४८ वर पोहोचणार आहे. त्यामुळे यंदा पक्षीय राजकारणाबरोबरच आघाड्या व इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
(चौकट)
एका मतदाराला दोघांना
द्यावे लागेल मत
पालिकेच्या एका प्रभागातून यंदा दोन नगरसेवक निवडून येणार आहेत. पक्ष, आघाड्या व अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले तरी एका मतदाराला दोन उमेदवारांनाच मत द्यावे लागणार आहे. नगरपंचायतीत मात्र एका मतदाराला एकाच उमेदवाराला मत देता येईल.
(चौकट)
शहराच्या विकासाला खीळ
(कोट)
पालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होता कामा नये. बहुसदस्यीय पद्धतीमुळे निवडणूक जिंकणे सोपे होते; पण कोणतीच कामे करता येत नाहीत. दोन नगरसेवकांमध्ये हेवेदावे, मतभेद वाढतात. एक वाॅर्ड असल्याने अशा अडचणी येत नाहीत. नगरसेवकाला वाॅर्डात सक्षमपणे कामे करता येतात.
- वसंत लेवे, नगरसेवक
(कोट)
राज्य मंत्रिमंडळाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. या निर्णयाचा पालिकेसाठी सक्षम असलेल्या उमेदवारालाच मोठा फटका बसणार आहे. बहुसदस्यीयमुळे विकासकामांना खो बसतो. या निर्णयाविरोधात आम्ही याचिका दाखल करणार आहोत.
- शंकर माळवदे, माजी उपनगराध्यक्ष
(चौकट)
राजकीय अपेक्षांवर पाणी
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा फटका छोटे पक्ष व अपक्षांनाच अधिक बसतो. उमेदवार कितीही सक्षम असला तरी त्याला निवडणूक जिंकणे कठीण होऊन बसते. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी सोयीचे राजकारण केल्याने इतर पक्षांच्या राजकीय अपेक्षांवर मात्र पाणी फेरले आहे.
- चंद्रकांत खंडाईत, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी