सोशल मीडियावर बनावट अकाउंट; २० तक्रारी; सात दिवसांत कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:51+5:302021-07-07T04:48:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सोशल मीडियावर फेक अकाउंटद्वारे बदनामी झाल्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. ज्यांनी सायबर ...

Fake accounts on social media; 20 complaints; Action in seven days! | सोशल मीडियावर बनावट अकाउंट; २० तक्रारी; सात दिवसांत कारवाई !

सोशल मीडियावर बनावट अकाउंट; २० तक्रारी; सात दिवसांत कारवाई !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सोशल मीडियावर फेक अकाउंटद्वारे बदनामी झाल्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहेत. ज्यांनी सायबर सेलकडे धाव घेतली. त्यांचे बनावट अकाउंट मात्र, चोवीस तासांच्या आत बंद करण्यात आले. परिणामी, व्हायरल होणारी बदनामी टळली; परंतु अनेक जण तक्रार देण्याचे टाळाटाळ करतात. त्यामुळे फेक अकाउंटचे षडयंत्र रचणाऱ्यांचे चांगलेच फावते. त्यामुळे असे प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ सायबर सेलशी संपर्क करणे गरजेचे आहे.

बनावट अकाउंटद्वारे विशेषत: मुलींच्या बदनामीचे प्रकार समोर आले आहेत. फेक अकाउंट उघडून त्याद्वारे अश्लील फोटो अपलोड करून बदनामी केली जाते. तसेच शिवीगाळ धमकीही दिली जाते. गेल्या काही वर्षांपासून असे प्रकार सातारा जिल्ह्यात वाढले आहेत. सायबर सेलकडे अशा प्रकारच्या वीस तक्रारी आल्या होत्या. यातील सर्व तक्रारींचा या सेलने अत्यंत काैशल्याने निपटारा केला. मात्र, बऱ्याच जणांना कुठे तक्रार करावी, हे समजत नाही. अशा प्रकारचा प्रसंग ओढावल्यास सात दिवसानंतर अकाउंट बंद होते.

कोरोना काळामध्ये वाढल्या तक्रारी

nकोरोनाकाळात फेसबुक अकादंट हॅक करून किंवा बनावट खाते उघडून पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढले. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. फेसबुकवर अनोळखी मुलींच्या नावाने फ्रेंड रिक्वेस्स्ट पाठववून ब्लॅकमेलचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे.

तक्रारीसाठी स्वतंत्र पोर्टल

nसमाजमाध्यमावर किंवा ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रार दाखल करण्यासाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. सर्वात अधी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी लागते. ही तक्रार संबंधित पोलीस ठाण्याचे अंमलदार किंवा तपास अधिकारी ते सायबर सेलकडे पाठवतात.

nतांत्रिक बाबींचा तपास सायबर सेलकडून करण्यात येतो. सायबर सेलकडून तपास करून आरोपींचा शोध लावण्यात येतो.

nसातारा जिल्ह्यात अशीच एक घटना घडली होती. एका युवतीची फेसबुकवर बदनामी करणाऱ्यास सायबर सेलने पोलिसांच्या मदतीने अटक केली होती.

n या पोर्टलवर तक्रारींचा ओघ कमी असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सुशिक्षित युवक व युवतींकडून या तक्रारी केल्या जातात. मात्र, ग्रामीण भागातून या पार्टलद्वारे तक्रारी कमी येतात.

तुम्हाला बनावट अकाउंट दिसले तर...

फेसबुकवर फेक अकाउंट शोधा. स्वत:च्या किंवा ज्याच्याकडून समजले त्याच्याकडून त्या प्रोफाइलची लिंक मागवून घ्या.

फेक अकाउंट दिसल्यास त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डाॅटवर क्लीक करा. त्यामध्ये फाइंड सपोर्ट आणि रिपोर्ट प्रोफाइलवर क्लिक करा.

प्रिटेंडिंग टू बी समवन वर या. पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करून स्वत: रिपोर्ट करत असाल तर मी सिलेक्क्ट करा. मित्रासाठी करत असाल तर फ्रेंड सिलेक्क्ट करणे गरजेचे आहे.

अनोखळी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्स्ट स्वीकारू नये. बऱ्याचदा यातून फसवणूकही होण्याची शक्यता असते.

ही घ्यावी काळजी...

nफेसबुकवर एकापेक्षा जास्त अकाउंट काढू नये.

nआपल्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड १ ते ९ अंक व ए टू झेड आणि स्पेशल कॅरेक्क्टर वापरून ठेवावा.

nफेसबुकच्या अकाउंटच्या सेटिंगमध्ये फ्रेंडलिस्स्टची सेटिंग ओनली फाॅर मी, अशी करावी.

n पैशांची मागणी झाल्यास दाद देऊ नये.

Web Title: Fake accounts on social media; 20 complaints; Action in seven days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.