दुचाकीमुळे झाला बनावट नोटांचा भांडाफोड --बातमी मागची बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:40 PM2018-06-15T23:40:31+5:302018-06-15T23:40:31+5:30

एका भाडेतत्त्वावर राहणाऱ्या फ्लॅटमध्ये कॉम्प्युटर, स्कॅनर व प्रिंटरच्या साह्याने पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा बनवून त्या बाजारपेठमध्ये खपविणाच्या प्रयत्न करणाºया टोळीचा एका दुचाकीमुळे

 Fake bogus notes due to bicycling - The latest news | दुचाकीमुळे झाला बनावट नोटांचा भांडाफोड --बातमी मागची बातमी

दुचाकीमुळे झाला बनावट नोटांचा भांडाफोड --बातमी मागची बातमी

Next

सातारा : एका भाडेतत्त्वावर राहणाऱ्या फ्लॅटमध्ये कॉम्प्युटर, स्कॅनर व प्रिंटरच्या साह्याने पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा बनवून त्या बाजारपेठमध्ये खपविणाच्या प्रयत्न करणाºया टोळीचा एका दुचाकीमुळे भांडाफोड झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, अटक केलेल्या सहाजणांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातारा शहरात बनावट नोटा तयार करणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून ५६ लाख ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा व १ लाख ३३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केल्यानंतर तीन बांधकाम व्यावसायिकांनी भांडवल कमी पडत असल्याने उच्चशिक्षित तरुणांच्या मदतीने वाढे परिसरातील मातोश्री पार्क व शुक्रवार पेठेतीलगणेश अपार्टमेंटमधील एक भाड्याच्या फ्लॅटमध्ये बनावट नोटा बनविण्यास सुरुवात केली.

मात्र, बनावट नोटा काही नातेवाईक व मित्रांनी त्या खोट्या असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वांनी मिळून हा नोटा बनविण्याचा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काही नोटा जाळून टाकल्या.मात्र, गणेश लहू भोंडे (वय २५, रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्याकडे पूर्ण छापलेल्या तर काही अर्धवट छपाई केलेल्या नोटा होत्या. त्या त्याने एका सॅकमध्ये ठेवल्या. ही सॅक दुचाकीच्या डिकीत ठेवली. दरम्यान, अमोल अर्जुन शिंदे याने काही कामानिमित्त गणेशला त्याची दुचाकी मागितली. ती दुचाकी घेऊन तो काम करून आपल्या घरी आला. त्यावेळी त्याचा भाचा अनिकेत यादव याने मित्राला भेटण्यासाठी नवीन एमआयडीसीत जाऊन येतो, असे सांगितले.

त्याठिकाणी अनिकेतने दुचाकीची डिकी उचकटून पाहिले असता त्यामध्ये खोट्या नोटा असल्याचे समजले. ही गोष्ट त्याने त्याचा मित्र शुभम खामकरला सांगितले. शुभमने त्यातील काहीनोटा आपल्या ठेवून त्या मिरज येथील एका हॉटेल व्यावसायिकाला देतो, असे सांगितले आणि त्यानोटा मिरजच्या व्यावसायिकाला दिल्या. बनावट नोटाप्रकरण उघडकीस आल्यानंतर साखळीनुसार साताºयात बनावट नोटाचेप्रकरण उघडकीस आले.

नोटांचा कागद जाड व छपाई काळपट
बनावट नोटा बाजारात आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीने काही नोटा मित्र व नातेवाइकांना दिल्या. मात्र, नोटांचा कागद जाड व छपाई काळपट होत असल्याने खोटी नोट असल्याचे सहज ओळखले जात होते.

Web Title:  Fake bogus notes due to bicycling - The latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.