कौटुंबिक वाद, पोलिसांसमोरच चाकू हातात घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; एका महिलेवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:17 PM2022-05-31T16:17:37+5:302022-05-31T16:18:04+5:30
‘तुम्हाला सगळ्यांना कायद्यात अडकवेन व नाक घासवयास लावेन,’ अशी दिली धमकी
सातारा : पोलिसांसमोरच एका महिलेने चाकू हातात घेऊन मला मारून घेणार, असे म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी संबंधित महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फातिमा सरफराज पठाण (वय ४०, रा. समर्थनगर, रहिमतपूर रोड, एमआयडीसी, सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कौटुंबिक वादावादी झाल्यानंतर तेथे पोलिसांची गाडी पोहोचली. त्या वेळी फिर्यादी सरफराज पठाण यांचा मुलगा गाडीवर बसत असताना फातिमा यांनी सरफराज पठाण यांचा मावसभाऊ समी पटेल याला ‘तुम्हाला सगळ्यांना कायद्यात अडकवेन व नाक घासवयास लावेन,’ अशी धमकी दिली.
त्यानंतर घरातील किचनकडे पळत जाऊन चाकू हातात घेऊन ‘मी मला मारून घेणार आहे,’ असे म्हणून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत सरफराज खलील पठाण (वय ४३, रा. एमआयडीसी, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.