सातारा : शेताने पांघरलाय हिरवा शालू, रब्बी पिके जोमदार; उत्पादनात वाढ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 02:02 PM2017-12-29T14:02:56+5:302017-12-29T14:05:28+5:30
कोरेगाव तालुका परिसरात अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांची जोमदार वाढ झाली आहे. त्यामुळे हिरवळीने बहरलेल्या शेताने जणू हिरवा शालूच पांघरल्याचे दृश्य शिवारात पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्याने वेळीच उपाययोजना केल्याने पिकांमध्ये सुधारणा घडून आली आहे. एकंदरीत रब्बी पिकांची सद्य:स्थिती लक्षात घेता यावर्षी भरघोस उत्पादनाची आशा आहे.
पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुका परिसरात अनुकूल वातावरणीय परिस्थितीमुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांची जोमदार वाढ झाली आहे. त्यामुळे हिरवळीने बहरलेल्या शेताने जणू हिरवा शालूच पांघरल्याचे दृश्य शिवारात पाहावयास मिळत आहे.
परिसरात यंदा समाधानकारक पाऊस झाला असून, मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या थंडीमुळे ज्वारी, गहू, हरभरा पिकांची जोमदार वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
ऐनवेळीच्या पावसामुळे पिकांवर किडींसह बुरशी सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला असला तरी शेतकऱ्याने वेळीच उपाययोजना केल्याने पिकांमध्ये सुधारणा घडून आली आहे. एकंदरीत रब्बी पिकांची सद्य:स्थिती लक्षात घेता यावर्षी भरघोस उत्पादनाची आशा आहे.