अवकाळीने कांदा अन् दराने शेतकरी कोलमडला..

By admin | Published: March 3, 2015 10:06 PM2015-03-03T22:06:36+5:302015-03-03T22:45:26+5:30

जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, फलटण आणि खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे

The farmer collapsed on the occasion of onion and grain. | अवकाळीने कांदा अन् दराने शेतकरी कोलमडला..

अवकाळीने कांदा अन् दराने शेतकरी कोलमडला..

Next

सातारा : शहरासह जिल्ह्यात शनिवार, रविवार सलग दोन दिवस झालेल्या वळिवाच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. हाता-तोंडाशी आलेली अनेक पिके भुईसपाट झाल्याने बळीराजा पुरता हैराण झाला आहे. वळिवाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसला असून तोडलेला कांदा भिजल्याने कांद्याचा भाव दोनच दिवसात गडगडला आहे.जिल्ह्यात गहू, ज्वारी, ऊस या पिकांबरोबरच कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अनेक ठिकाणी कांदा काढणीला आला आहे. तर काही ठिकाणी कांद्याची तोडणी पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा सुकण्यासाठी रानात ठेवला होता. अशा परिस्थितीत जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तोडून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजल्याने कांदा उत्पादक याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.कांदा ओला झाल्याने दोनच दिवसात कांद्याचे दर कोलमोडले असून बाजारपेठेत सध्या लहान आकाराचा व कांदा १० रुपये किलोने विकला जात आहे. काही दिवसांपूर्वी हाच कांदा २० ते २५ रुपये या दराने विकला जात होता. होणारे नुकसान टाळण्यासाठी सध्या शेतकरी मिळेल या दराला कांद्याची विक्री करीत आहेत. सातारा शहरात शेतकरी फिरत्या वाहनामधून कांद्यांची विक्री करताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, सातारा, फलटण आणि खटाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)

बाजारपेठेत वाळलेल्या कांद्याला मोठी मागणी असते. या कांद्याला भावही चांगला मिळतो. अवकाळी पावसाचा कांद्याला मोठा फटका बसल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे झाल्यास भविष्यात कांद्याचे दर वाढणार असल्याची भीती ग्राहकांमधून व्यक्त होत आहे.


नकांद्याला चांगला दर मिळेल म्हणन आशावादी असतानाच अवकाळी पावसाने घात केला. कांदा भिजल्यामुळे कोंब फुटण्याची शक्यता असून, आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज व वीजबिल माफ करावे अन्यथा शेतकरी कोलमंडुन जाईल.
- भानुदास कापसे,
शेतकरी, राजापूर

Web Title: The farmer collapsed on the occasion of onion and grain.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.