दूध व्यवसाय डबघाईला शेतकरी हताश : दर नाही, एका गायीमागे दररोज पाचशे रुपये खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:11 AM2018-05-11T00:11:59+5:302018-05-11T00:11:59+5:30
वाठार निंबाळकर : दूध दर ढासळल्याने दूध उत्पादक शेतकरी हताश व शासनावर संतप्त झाल्याचे दिसून येत आहे. फलटण तालुक्यात शेतीला पूरक जोड धंदा म्हणून तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण शेतकरी यांनी नोकरी मिळत नाही म्हणून शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात केला असून, आज फलटण तालुक्यात गाय, म्हैसवर्गीय ८७९६३ जनावरे, तर शेळी, मेंढ्या १ लाख ११ हजार इतकी जनावरे फलटण तालुक्यात आहेत.
गेल्या तीन वर्षांपूर्वी हा दूध व्यवसाय अत्यंत उत्तम पद्धतीने सुरू होता. लिटरला २८ रुपये इतका दर होता. मात्र सध्याचा दर १८ रुपये प्रति लिटर इतका मिळत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, वैरणीचे दर शेकडा २५०० रुपये ४००० रुपयांपर्यंत आहेत. तर ओला मका शेतात जागेवर ३५०० रुपये ते ४००० रुपये अडीच गुंठे इतक्या दराने घ्यावे लागत आहे. तर पशुखाद्य ५९ किलोसाठी १२०० ते १४०० रुयपे दराने भुसा ४९ किलोसाठी १०० ते १३०० रुपये दराने घ्यावे लागत आहे.
दुधाऱ्या गायीसाठी प्रतिदिन कमीत कमी २५ किलो ओला व सुका चारा लागतो. त्यासाठी १७५ रुपये पेंड पशुखाद्य ५ किलो त्यासाठी १२० रुपये भुसा ४ किलो, १०८ रुपये असा एका गायीसाठी दररोज ४०३ रुपये प्रतिदिन खर्च येतो. सध्या उन्हाळ्याच्या दिवसात येत असून, पावसाळ्यामध्ये ओला चारा मुबलक असल्याने चाºयाचे दर कमी असतात.
सध्या दूध दर १८ रुपये मिळत असून, काही ठिकाणी १९ रुपये मिळत आहे. एका गायीचे दोन वेळचे २० लिटर दूध मिळाले तरी ३६० ते ३८० रुपये मिळाला जात आहे. परिणामी २३ ते ३३ रुपये प्रतिदिन तोटा शेतकºयांना सोसावा लागत आहे. चाºयाचे, आजार टॉनिक, कॅलशियम आदींचा खर्च वेगळा होत आहे.
दुधाला दर १८ रुपये पाण्याचाी बाटली २० रुपये आहे. ही इतकी गंभीर परिस्थिती झाली आहे. रोज ३० ते ३५ रुपये तोटा एका गायीमागे होत आहे. शासनाने उसाप्रमाणे दुधालाही ३४ ते ३५ रुपये इतका हमीभाव द्यावा, अशी मागणी होत आहे.
- दादासाहेब निंबाळकर, शेतकरी, तावडी
नोकरी, मालाला दर नाही; मग कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा? तरुणांनी डेअरीमार्फत उचली घेऊन गायी घेतो. त्या गायींना विकताना किमी पैसे मिळतात. मग डेअरीचे पैसे द्याचे कस? अशी अवस्था आहे.
- नामदेव काळे, शेतकरी, मिरढे
गेल्या तीन वर्षांपूर्वी २८ रुपये दर होता. त्यामुळे कुटुंब उत्तम पद्धतीने चालविता येत होते. आता मात्र जनावरांचे भागत नाही तर घर कसे चालवायचे? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
- अरुण ननावरे, धुळदेव