दानवलेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 03:58 PM2021-07-19T15:58:18+5:302021-07-19T15:59:09+5:30

Accident Satara : माण तालुक्यातील दानवलेवाडी येथे शेताच्या बांधावर गवत काढत असताना विद्युत खांबावरील आर्थिंग तारेचा शॉक लागल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

Farmer dies of electric shock in Danwalewadi | दानवलेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

दानवलेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देदानवलेवाडीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यूदहिवडी पोलीस ठाण्यात नोंद

सातारा: माण तालुक्यातील दानवलेवाडी येथे शेताच्या बांधावर गवत काढत असताना विद्युत खांबावरील आर्थिंग तारेचा शॉक लागल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

बाबूराव बंडू शिंदे (वय ६०, रा. दानवलेवाडी, ता. माण, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून ही घटना दि. १८ जूलै रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली .

याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, बाबूराव शिंदे हे दानवलेवाडी येथील मावला नावाच्या शिवारात शेतातील बांधावर गवत काढत होते.

यावेळी त्यांनी विद्युत खांबाच्या आर्थिंगच्या तारेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर मालोजी एकनाथ शिंदे (वय ४५, रा. दानवलेवाडी) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास सहायक फौजदार एम. जे. राऊत हे करत आहेत.

Web Title: Farmer dies of electric shock in Danwalewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.