पावसाच्या ‘खोखो’मुळे शेतकरी संभ्रमात
By Admin | Published: July 28, 2015 11:11 PM2015-07-28T23:11:15+5:302015-07-28T23:11:15+5:30
पिके धोक्यात : अजूनही हवाय दमदार पाऊस
महाबळेश्वर : सर्वाधिक पावसाचे व थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे पर्यटक सुखावले असून, या अल्हाददायक वातावरणाची मजा लुटण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरत दाखल होत आहे. पर्यटक भर पावसातही नौकाविहाराबरोबरच घोडसवारीची मजा लुटत आहेत.
महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. बारमाही हंगाम असल्याने विकेंडला येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. पावसाळ्यात पर्यटकांची संख्या जरी मंदावत असली तरी हौशी पर्यटकांची पावसाची मजा लुटण्यासाठी महाबळेश्वरात रेलचेल सुरू असते. यंदाही महाबळेश्वरसह पाचगणीत पर्यटक दाखल झाले असून, पर्यटक विविध पॉइंटला भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. भर पावसात घोड्यांवर रपेट मारण्याबरोबरच पर्यटक वेण्णा तलावात नौकाविहार करतानाही दिसून येत आहेत.येथील लिंगमळा, अंबेनळी घाटात असणारा मेटतळे धबधबा पर्यटकांना आकर्षिक करीत असून, पर्यटक हा जलप्रपात पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत.
काही अतिउत्साही पर्यटक निसर्गाचा आस्वाद घेत असताना पॉर्इंटच्या कडेला जाऊन उभे राहणे , पाण्यात जाऊन खेळणे, दंगामस्ती करेण आदी प्रकार करत आहेत. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवावा अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
कणसांना मागणी वाढली
महाबळेश्वरात इतर ऋतूंच्या तुलनेत पावसाळ्यात कणसांना मोठी मागणी असते. पाऊस अन् दाट धुके अशा वातावरणात पर्यटक वाफाळलेल्या गरमागरम कणसांना पसंती देतात. येथील विविध पॉइंट तसेच मुख्य बाजारपेठेत कणीस विक्रेत्यांची संख्या अधिक असून, सुगीचे दिवस आल्याने विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पर्यटकांमधून स्वीट कॉर्न या कणसाला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे.