शेतकऱ्यांना सात दिवस वीजपुरवठा हवाच

By admin | Published: November 23, 2014 08:40 PM2014-11-23T20:40:12+5:302014-11-23T23:47:36+5:30

नितीन भरगुडे-पाटील : महावितरण कंपनीवर ताशेरे

Farmers need electricity for seven days | शेतकऱ्यांना सात दिवस वीजपुरवठा हवाच

शेतकऱ्यांना सात दिवस वीजपुरवठा हवाच

Next

खंडाळा : खंडाळा तालुक्यात औद्योगिकीकरण वाढत आहे. त्या उद्योगधंद्यांना मदत करणारी एजन्सी वीज कंपनी आहे का? शेतकऱ्यांना वीज देण्याबाबत दुजाभाव का? असा सवाल करीत तालुक्यातील शेतकऱ्यांना सलग सात दिवस दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, तसे न झाल्यास रास्ता रोको करावा लागेल, असा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व तालुका पंचायत समितीचे सदस्य नितीन भरगुडे-पाटील यांनी दिला. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या रस्त्यावर कंपनीच्या हिताकरिता खांब रोवले तर विरोध करून फौजदारी गुन्हे दाखल करू, असे बैठकीत ठणकावून सांगण्यात आले.
तालुका पंचायत समितीच्या दिवंगत लक्ष्मणराव भरगुडे-पाटील सभागृहात पंचायत समितीचे पदाधिकारी व वीज कंपनीचे अधिकारी यांची बैठक सभापती रमेश धायगुडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य नितीन भरगुडे-पाटील, अनिरुद्ध गाढवे, दीपाली साळुंखे, बाळासाहेब साळुंखे, गटविकास अधिकारी विलास साबळे आदी उपस्थित होते.
वीज कंपनीचा भोंगळ कारभार आणि शेतकऱ्यांच्या समस्या यावर बैठकीत चर्चा झाली.
भरगुडे-पाटील म्हणाले, ‘तालुक्यातील शेतकऱ्यांनी औद्योगिकीकरणासाठी जमिनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांकडे जमिनी राहिल्या, त्यांना पुरेशी वीज मिळावी,अशी अपेक्षा आहे. तालुक्यात वीज उपलब्धतेबाबत समतोल ठेवावा आणि सोमवार ते रविवार अशी सलग सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वीज द्या; अन्यथा सभापती धायगुडे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करावे लागेल, असा इशारा दिला.
पाणीपुरवठा योजनांना चोवीस तास वीज मिळावी, अशी मागणी करीत बेंगरुटवाडी, हरळी येथे वीज कंपनीचे कर्मचारी विजेचा दोष काढण्यासाठी सहकार्य करीत नसल्याबाबत अनिरुद्ध गाढवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर सलग आठ तास वीज द्या, अशी मागणी केली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. एम. कुलकर्णी म्हणाले, ‘२००३ मध्ये केंद्र शासनाने कायदा केला आहे. महावितरणसह अन्य कंपन्यांवर ऊर्जा आयोगाचे नियंत्रण असल्याने वीज भारनियमनामध्ये बदल करण्याचा अधिकार शासनाला नाही. विजेची मागणी व पुरवठा यामध्ये तफावत आहे. त्यानुसार चार दिवस दिवसा व तीन रात्री वीज पुरवठ्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Farmers need electricity for seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.