शेतकरी संस्थांनी समन्वय साधणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:12 AM2021-02-18T05:12:36+5:302021-02-18T05:12:36+5:30
कऱ्हाड तालुक्याच्या कृषी पाहणी दौऱ्यासाठी ते आले असताना कोपर्डे हवेली येथील कृषिसंगम संस्था व सैदापुर कृषी मंडलाने आयोजित केलेल्या ...
कऱ्हाड तालुक्याच्या कृषी पाहणी दौऱ्यासाठी ते आले असताना कोपर्डे हवेली येथील कृषिसंगम संस्था व सैदापुर कृषी मंडलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, वाईचे चंद्रकांत गोरड, तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला, हरिश्चंद्र धुमाळ, सैदापूर मंडलचे व्ही. डी. कदम, सुजित शिंदे, ज्ञानदेव जाधव, सुनील ताकटे आदींसह कृषिसंगमचे संचालक संभाजी चव्हाण, एल. के. पाटील, हणमंत चव्हाण, मारुती चव्हाण, जयंत पाटील, अमोल चव्हाण, शंकर पोळ, सुनील चव्हाण, गणेश चव्हाण उपस्थित होते.
कऱ्हाड तालुका कृषी अधिकारी आर. एम. मुल्ला म्हणाले, कोरोनाच्या काळात संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत चांगले काम केले आहे. सध्या शेतकऱ्यांचा माल संस्थेच्या माध्यमातून पुण्याला पाठवण्यात येत असल्याने संस्थेचे भविष्य चांगले आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात ठेवून काम केले पाहिजे. जे पिकेल ते विकेल हाच उद्देश ठेवून संस्था काम करत असल्याने दुसऱ्या संस्थांनी कृषिसंगमचा आदर्श घेऊन काम करावे.
जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. विनोद कदम यांनी सूत्रसंचालन केले. संचालक संभाजी चव्हाण यांनी आभार मानले.
- चौकट
विविध ठिकाणी दिल्या भेटी
तालुका कृषी अधिकारी, मंडल अधिकारी यांचा कऱ्हाड दौरा संपन्न झाला. त्यामध्ये कोपर्डे हवेली, जखिणवाडी, चचेगाव, पोतले, उंडाळे, सैदापूर आदी गावातील शेतकरी, शेतीगट, शेतकरी संस्था आदी ठिकाणी भेटी देऊन त्यांनी मार्गदर्शन केले.
फोटो : १७केआरडी०३
कॅप्शन : कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड येथील कृषिसंगम संस्थेच्या कार्यक्रमात आत्माचे जिल्हा उपसंचालक अशोक देसाई व आर. एम. मुल्ला यांनी मार्गदर्शन केले.