अंगापुरात स्वाभिमानीच्या मेळाव्यास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:41 AM2021-09-26T04:41:46+5:302021-09-26T04:41:46+5:30
सातारा तालुक्यातील अंगापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...
सातारा तालुक्यातील अंगापूर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे जिल्हा सरचिटणीस राजू केंजळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुनराव साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य व चेअरमन दत्तात्रय पाटील, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष रमेश पिसाळ यांची उपस्थिती होती.
शेळके म्हणाले, ‘केंद्र शासन व राज्य शासन शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकरकमी एफआरपीचे तुकडे पाडण्याचा डाव आखत आहे. तसे झाल्यास ऊसदराचे तुकडे पाडणाऱ्या कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही. शेतकऱ्यांनी थकीत ऊसबिल व ऊसदराचे तुकडे याविरोधात एकजूट करून लढले पाहिजे. आजपर्यंत कोल्हापूर, सांगली उसाच्या रास्त दरासाठी भांडत आहेत. आता आपणही लढा दिला पाहिजे.’
यावेळी राजेंद्र शेडगे, तुकाराम शेडगे, योगेश पवार, सौरभ कोकीळ, समाधान कणसे, अमोल कणसे, बजरंग कणसे, मारुती कणसे, विजय शेडगे, पांडुरंग गवळी, गणेश दीक्षित, गणेश काळे, विजय कोळी, संजय भुजबळ उपस्थित होते. पांडुरंग गवळी यांनी प्रास्ताविक केले. जयवंत जाधव यांनी आभार मानले.