शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:44+5:302021-06-19T04:25:44+5:30

गत आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र, तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नाही. कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक ...

Farmers should not bother for sowing! | शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये!

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये!

Next

गत आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. मात्र, तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नाही. कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनासाठी पेरणीची पूर्वतयारीची कामे शेतकऱ्यांनी करावीत. भातपिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील सोयाबीन पिकासाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्वमशागतीची कामे करावीत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वखराच्या पाळ्या देऊन तयार करावी. मात्र, किमान ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे पुरेसा पाऊस झाल्याशिवाय आणि पुरेशा खोलीवर ओलावा पोहोचल्याशिवाय पेरणीची गडबड करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Web Title: Farmers should not bother for sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.