शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:42 AM2021-08-19T04:42:50+5:302021-08-19T04:42:50+5:30
कोरेगाव : विषमुक्त शेती ही काळाची गरज असून, रोगराईपासून अंतर राखायचे असल्यास शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन ...
कोरेगाव : विषमुक्त शेती ही काळाची गरज असून, रोगराईपासून अंतर राखायचे असल्यास शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.
कृषी विभागातर्फे सातारा रोड येथे झालेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, प्रांताधिकारी ज्योती पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्र. बर्गे, तहसीलदार अमोल कदम, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शेळके, सरपंच किशोर फाळके-पाटील, उपसरपंच प्रताप पवार यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी शिंदे बोलत होते.
यावेळी आदर्श शेतकरी व शेतकरी बचत गटाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कृषी सहाय्यक गौरी डेरे-बर्गे यांनी स्वागत केले. मंडल कृषी अधिकारी प्रीतेश माळी यांनी प्रास्ताविक केले तर कृषी सहाय्यक अंजली फडतरे यांनी आभार मानले.