शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणांचा वापर करावा : भोईटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:26 AM2021-06-19T04:26:02+5:302021-06-19T04:26:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपोडे बुद्रुक : ‘शेती पिकाच्या भरघोस उत्पादनात बियाणे, खते, औषधी यांचे सुयोग्य नियोजन गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपोडे बुद्रुक : ‘शेती पिकाच्या भरघोस उत्पादनात बियाणे, खते, औषधी यांचे सुयोग्य नियोजन गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी प्रमाणित निविष्ठांचा वापर करणे गरजेचे आहे,’ असे मत वाघोली येथील कृषीतज्ज्ञ अमोल भोईटे यांनी व्यक्त केले.
सद्य:स्थितीत शिवारात सुरू असलेल्या खरीप पेरणी काळात शेतकऱ्यांना पेरणीविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अमोल भोईटे म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी पेरणीसाठी प्रमाणित खते, बियाणांचा वापर करावा. पेरणीपूर्वी बियाणांची बीजप्रक्रिया करण्याचे फायदे आहे. तण, कीड व रोग यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. बहुतांशी वेळा कायमस्वरूपी वापरल्या जाणाऱ्या घरगुती बियाणांमुळे शेती उत्पादनात घट होत असते. याउलट प्रमाणित बियाणांमुळे इतर खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होते. यासाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणांचा वापर करणे गरजेचे आहे.’