कास परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:41 AM2021-05-21T04:41:25+5:302021-05-21T04:41:25+5:30

पेट्री : कास पठार परिसरातील दुर्गम, डोंगर माथ्यावरील काही भागात सततच्या पावसाने व तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे झालेल्या ...

Farmers worried over torrential rains in Kas area | कास परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी चिंताग्रस्त

कास परिसरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शेतकरी चिंताग्रस्त

Next

पेट्री : कास पठार परिसरातील दुर्गम, डोंगर माथ्यावरील काही भागात सततच्या पावसाने व तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्याप्रमाणावर गवताच्या गंजी व शेणारा भिजल्याने झालेल्या नुकसानाबाबत शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाल्याचे चित्र आहे.

कासपठार परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावर शेती हा मुख्य व्यवसाय आहे. जोडव्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते. या भागात मोठयाप्रमाणावर पर्जन्यवृष्टी होते. पावसाळ्यात जनावरांना चारा उपलब्ध व्हावा, यासाठी हिवाळ्यात डोंगरभागात उपलब्ध होणाऱ्या गवताची कापणी मोठ्या प्रमाणावर करून गवताच्या गंजी रचल्या जातात. इंधनासाठी उन्हाळ्यात शेण्या थापून त्या सुकवून त्याचे शेणारे रचून पावसाळ्यात उपयोगात आणले जातात.

गेल्या पंधरवडयात अचानक मुसळधार पावसाची हजेरी तसेच तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. गारपिटीसह मुसळधार पाऊस झाल्याने शेणारा व गवताच्या गंजी सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकरी वर्गाची चांगलीच धावपळ झाली होती. काही ठिकाणचे शेणारे व गवताच्या गंजी भिजल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान होऊन पावसाळ्यात जनावरांना चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, याबाबत मोठा यक्ष प्रश्न शेतकरी वर्गासमोर निर्माण झाला आहे.

चौकट

गंजीतील गवत भिजल्याने मोठयाप्रमाणावर नुकसान होऊन गवत कुजले आहे. भिजलेले गवत पुन्हा उन्हात वाळवण्यासाठी किमान दोन दिवस तरी कडक ऊन हवे. परंतु पावसाची उघडीप काही होईना. भिजलेले गवत वाळवल्याशिवाय घरात सुरक्षित ठेवता येत नाही. भिजलेले गवत घरात ठेवायचे म्हटल्यास सुईरसारख्या उपद्रवी कीटकांच्या मोठया त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे पावसाच्या उघडिपीची प्रतीक्षा शेतकरी वर्गाला लागली आहे. तसेच पावसाळ्यात इंधनासाठी वापरलेल्या शेण्यादेखील भिजल्याने पुन्हा या शेण्या वाळवण्यासाठी कडक उन्हाची गरज असल्याचे बोलले जात आहे.

कोट

गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसाने मोठयाप्रमाणावर नुकसान होऊन जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा तसेच शेणारे भिजल्याने किमान आठ दिवस तरी पावसाची चांगली उघडीप अपेक्षित आहे. दुपारी ऊन, सायंकाळी पुन्हा पावसाचे वातावरण होत आहे.

- ज्ञानेश्वर आखाडे, शेतकरी, कुसुंबीमुरा

फोटो २०पेट्री-ग्रास

कास परिसरात झालेल्या पावसामुळे गवत भिजले आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. (छाया : सागर चव्हाण)

डोंगरमाथ्यावरील कुसुंबीमुरा (ता. जावळी) येथे मुसळधार पावसाने गवताच्या गंजी मोठया प्रमाणावर भिजून गवत कुजले आहे.

(छाया -सागर चव्हाण )

Web Title: Farmers worried over torrential rains in Kas area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.