फलटणमधील उपोषण मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:42+5:302021-06-03T04:27:42+5:30

फलटण : फलटण नगरपालिकेच्या राजधानी टॉवर या शॉपिंग सेंटर कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक १ आणि २ मध्ये बेकायदेशीर करण्यात आलेल्या ...

The fast in Phaltan was called off after assurances from the chief minister | फलटणमधील उपोषण मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे

फलटणमधील उपोषण मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मागे

Next

फलटण : फलटण नगरपालिकेच्या राजधानी टॉवर या शॉपिंग सेंटर कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक १ आणि २ मध्ये बेकायदेशीर करण्यात आलेल्या बांधकामावर लवकरच कारवाई होणार आहे. नगरपालिकेच्या विरोधी गटाचे नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना घेरून जाब विचारून पुढे आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर अखेर मुख्याधिकारी यांनी येत्या २० जूनपर्यंत ते बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर तपासणी करून बेकायदा आढळल्यास पाडण्याचे आश्वासन दिले आहे.

विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, अनुप शहा यांनी फलटण नगरपालिकेच्या राजधानी टॉवर या शॉपिंग सेंटर कॉम्प्लेक्समधील गाळा क्रमांक १ आणि २ मध्ये बेकायदेशीर करण्यात आलेल्या बांधकामावर सातत्याने आवाज उठवला होता. विशेषतः अशोकराव जाधव यांनी सातत्याने लेखी पाठपुरावा नगरपालिका प्रशासनाकडे केला होता. एका बाजूला सर्वसामान्य नागरिकांची अतिक्रमणे पालिका काढत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला पालिकेने बांधलेल्या शॉपिंग सेंटरमध्ये गाळा क्रमांक १ आणि २ मध्ये बेकायदा व मूळ नकाशा सोडून बांधकाम करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाला निदर्शनास आणून दिले होते. एवढंच नव्हे तर १ जून रोजी पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारादेखील जाधव यांनी दिला होता.

तत्पूर्वी नूतन मुख्याधिकारी यांना मूळ नकाशा आणि करण्यात आलेले बेकायदा बांधकाम याची माहिती विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे यांनी दाखवून दिली, तरीदेखील राजकीय दबावाखाली आलेल्या मुख्याधिकारी यांनी कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देणे टाळले. मात्र, जाहीर केल्याप्रमाणे १ जून रोजी आंदोलनास सुरुवात केल्यानंतर अखेर मुख्याधिकाऱ्यांनी २० जूनपर्यंत त्या बेकायदा बांधकामांवर कायदेशीर तपासणी करून बेकायदा आढळल्यास कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी विरोधी गटाचे नगरसेवक सचिन बेडके, अनुप शहा, नगरसेविका उपस्थित होत्या.

Web Title: The fast in Phaltan was called off after assurances from the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.