खाशाबा जाधव प्रशिक्षण केंद्रासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:44 AM2021-08-21T04:44:03+5:302021-08-21T04:44:03+5:30

कऱ्हाड : खाशाबा जाधव प्रशिक्षण केंद्रासाठी कऱ्हाडमध्ये सोमवारी, २३ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. राज्य शासनाकडून २००९ साली ...

Fasting for Khashaba Jadhav Training Center | खाशाबा जाधव प्रशिक्षण केंद्रासाठी उपोषण

खाशाबा जाधव प्रशिक्षण केंद्रासाठी उपोषण

googlenewsNext

कऱ्हाड : खाशाबा जाधव प्रशिक्षण केंद्रासाठी कऱ्हाडमध्ये सोमवारी, २३ ऑगस्टला लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. राज्य शासनाकडून २००९ साली मंजुरी मिळूनही हे काम रखडल्याने राज्यातील खेळाडूंवर मोठा अन्याय होत असल्याचे सांगून शासनाचे लक्ष वेधण्यासाठीच हे उपोषण केले जाणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते पै. सचिन पाटील यांनी सांगितले आहे.

राज्य शासनाने ३० जून २००९ रोजी कऱ्हाडात ऑलिम्पिकवीर खाशाबा राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रास मान्यता दिली होती. गोळेश्वरनजीक होणाऱ्या क्रीडा संकुलाचे काम त्वरित मार्गी लागल्यास जिल्ह्यासह राज्यातील कुस्ती शौकिनांसह मल्लांना मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा फोल ठरली असून देशाला ऑलिम्पिकमध्ये सात पदके मिळूनही महाराष्ट्रातील एकाही खेळाला पदक मिळालेले नाही. देशात वैयक्तिक क्रीडा प्रकारात महाराष्ट्रातील दिवंगत खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवून दिल्यानंतर आजवर एकही पदक महाराष्ट्रातील खेळाडूंना मिळालेले नाही. ही मोठी शोकांतिका असून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषण केले जात आहे.

पै. खाशाबा जाधव यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावे, ही मागणीही प्रलंबितच आहे. खाशाबा जाधव यांची जयंती व पुण्यतिथीला युवा पिढीला प्रोत्साहन मिळेल, अशा उपक्रमांचे शासनाकडून आयोजन होत नाही. याशिवाय खाशाबा जाधव यांच्या नावाने होणारी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धाही दोन वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे ही स्पर्धा तसेच क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागावे, या मागणीसाठी सोमवार, २३ ऑगस्टला उपोषण केले जाणार आहे.

Web Title: Fasting for Khashaba Jadhav Training Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.