फलटणमध्ये दिग्गजांचे भवितव्य मशीनबंद

By admin | Published: February 21, 2017 11:32 PM2017-02-21T23:32:20+5:302017-02-21T23:32:20+5:30

तालुक्यात ६९.९२ टक्के मतदान : दुपारनंतर वाढला टक्का; मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष

The fate of veterans in Phaltan | फलटणमध्ये दिग्गजांचे भवितव्य मशीनबंद

फलटणमध्ये दिग्गजांचे भवितव्य मशीनबंद

Next


फलटण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी फलटण तालुक्यात चुरशीने ६९.९२ टक्के मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता निकालाकडे लागून राहिले आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेचे ७ व पंचायत समितीचे १४ गण असून, जिल्हा परिषदेसाठी ३३ तर पंचायत समितीसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदानास शांततेत सुरुवात झाली. सकाळी साडेसात ते साडेनऊ यावेळेत १० टक्के तर दुपारी साडेतीनपर्यंत ५५.८४ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला होता.
उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर पडण्यासाठी विनविण्या करताना दिसत होते. अनेक उमेदवारांनी मतदाराला मतदानाला आणण्यासाठी व पुन्हा सोडण्यासाठी चारचाकी वाहनांची सोय केली होती. अपंग किंवा अत्यंत वयस्कर यांना मतदान केंद्राच्या बाहेर वाहनातून आणून सोडले जात होते.
आमदार दीपक चव्हाण यांनी तरडगाव मतदान केंद्रावर तर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व त्यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांनी कोळकी येथे मतदान केले. दोघेही राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवीत आहेत. वाठार निंबाळकर गणातील उमेदवार विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांनी सोनगाव बंगला येथे मतदान केले.
राष्ट्रीय काँग्रेसच्या गिरवी जिल्हा परिषद गटातील उमेदवार अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी निंभोरे, हिंगणगाव गटातील धनंजय साळुंखे-पाटील यांनी सुरवडी येथे तर गिरवी पंचायत समिती उमेदवार जयश्री आगवणे यांनी गिरवी येथे मतदान केले.
भाजपाचे गिरवी गटातील उमेदवारी सह्याद्री कदम यांनी गिरवी येथे मतदान केले. राष्ट्रीय काँगे्रसचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांनी सुरवडी येथे तर दिगंबर आगवणे यांनी गिरवी येथे मतदान केले.
रात्री उशिरा सर्व मतदान यंत्रे पोलिस बंदोबस्तात फलटण येथील शासकीय गोडावून येथे सुरक्षितरीत्या आणून ठेवण्यात आली. मतमोजणी गुरुवार, दि. २३ रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The fate of veterans in Phaltan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.