सासऱ्याचा सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न, विचारला अचंबित करणारा प्रश्न; पाचजणांवर गुन्हा
By दत्ता यादव | Published: September 19, 2022 11:52 AM2022-09-19T11:52:55+5:302022-09-19T12:03:31+5:30
‘तुमच्या दोघांच्या मध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे. तू समाधानी आहेस का,’ असं म्हणून सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न केला.
सातारा: ‘तुमच्या दोघांमध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे, तू समाधानी आहेस का,’ असा अचंबित करणारा प्रश्न सासऱ्याने सुनेला विचारल्याने सुनेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन सासऱ्याच्याविरोधातविनयभंगचा गुन्हा दाखल केला. तर पतीसह इतर चारजणांनी तिचा मानसिक छळ केला म्हणून त्यांच्यावर जाचहाटाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय विवाहितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या पतीसह सासऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पतीसह इतर चारजणांनी ‘तुला स्वयंपाक नीट करता येत नाही. आमचे घराचे कर्जाचे पैसे भर,’ असे बोलून मारहाण केली तर सासऱ्याने ‘तुमच्या दोघांच्या मध्ये प्रणयक्रीडा कशी चालू आहे. तू समाधानी आहेस का,’ असं म्हणून सुनेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर संबंधित पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.