सासऱ्याने जावयाच्या अंगावर घातली चारचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:27+5:302021-05-31T04:28:27+5:30

वाई : येथील वाकेश्वरनजीक एका गॅरेज परिसरात सासऱ्याने जावयाच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ...

The father-in-law put a four-wheeler on Java's body | सासऱ्याने जावयाच्या अंगावर घातली चारचाकी

सासऱ्याने जावयाच्या अंगावर घातली चारचाकी

Next

वाई : येथील वाकेश्वरनजीक एका गॅरेज परिसरात सासऱ्याने जावयाच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दोनजण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याने जखमी जावयाने सासऱ्याविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदित्य दिनकर ठोंबरे (वय २७, रा. वाकेश्वर फाटा, बावधन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ते सैन्यात असून, सध्या सिक्कीम येथे सेवेत आहेत. सुट्टीनिमित्ताने ते गावात आले असून, दि. ७ मे २०२१ रोजी त्यांनी त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या सालविका संदीप पिसाळ हिच्यासोबत प्रेमविवाह केला. त्याचा राग मनात धरून संदीप मदन पिसाळ (रा. वाकेश्वर फाटा, बावधन) यांनी आदित्य हे त्यांचा चुलत भाऊ नितीन याच्यासोबत दुचाकीवरून दि. २८ रोजी सायंकाळी वाई येथे निघाले असताना, संदीप पिसाळ यांनी त्यांच्या चारचाकी गाडीतून जोरात शिव्या देत दुचाकीला पाठीमागून धडक दिली व ते निघून गेले. या धकडेत आदित्य आणि नितीन हे दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाई पोलिसांनी संदीप पिसाळ यांना अद्याप अटक केलेली नाही.

Web Title: The father-in-law put a four-wheeler on Java's body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.