विरवडेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:30 AM2021-04-29T04:30:33+5:302021-04-29T04:30:33+5:30

विरवडे गावात औषध फवारणीचे काम सुरू करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच अर्चना मदने, उपसरपंच सागर ...

Fear of increasing patient numbers in Virwad | विरवडेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे धास्ती

विरवडेत रुग्णसंख्या वाढल्यामुळे धास्ती

Next

विरवडे गावात औषध फवारणीचे काम सुरू करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच अर्चना मदने, उपसरपंच सागर हाके, राजन धोकटे, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र कोल्हटकर, नितीन आवळे, संदीप लोंढे, तलाठी सुजित थोरात, ग्रामसेवक शिवाजी लाटे, पोलीस पाटील अमित वीर, आशा वैशाली मरगळे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

हजारमाची व ओगलेवाडीत कोरोनाचा कहर सुरू आहे. विरवडे गावातही मोठ्या संख्येने कोरोना बाधित आढळत आहेत. ग्रामपंचायत क्षेत्राचा विस्तार मोठा आहे. ओगलेवाडीची बाजारपेठ गावालगतच येते. ओगलेवाडी भाजी मंडई विरवडे हद्दीत भरते. तर करवडी फाट्यापासून ते ओगलेवाडी चौकापर्यंतच्या रस्त्याची पश्चिम बाजू व एमएसईबी वसाहतीची उत्तर बाजू विरवडे हद्दीत येते. याच भागात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. विरवडे ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करत संपूर्ण गाव सॅनिटाईझ करण्याचे काम हाती घेतले आहे. गावातील वाढत्या रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन सागर शिवदास व चंद्रकांत मदने यांनी दिले.

Web Title: Fear of increasing patient numbers in Virwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.