कोळेवाडीत धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:57+5:302021-04-07T04:40:57+5:30
कऱ्हाड : कोळेवाडी, ता. कऱ्हाड येथे १० जण बाधित आढळल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. शनिवारी कोळेवाडी येथे ...
कऱ्हाड : कोळेवाडी, ता. कऱ्हाड येथे १० जण बाधित आढळल्यामुळे आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. शनिवारी कोळेवाडी येथे कोळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने तपासणी शिबिर घेण्यात आले होते. त्यावेळी ५० जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १० जणांचे अहवाल बाधित आले आहेत.
पाणी पुरवठा सुरळीत
कऱ्हाड : शहरातील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीला गळती लागली होती. त्याची दखल घेत पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून टाकीची गळती काढण्यात आली असून विभागातील पाणी पुरवठा पूर्ण दाबाने व सुरळीत होत असल्याची माहिती नगरसेवक हणमंतराव पवार यांनी दिली. रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीला गत अनेक दिवसांपासून गळती लागली होती.
निर्बंधाची अंमलबजावणी
कऱ्हाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीर राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याची अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोशल डिस्टन्स न पाळणा-या तसेच मास्कचा वापर न करणा-या नागरिकांना दंड केला जात असून नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मान्याचीवाडीत लसीकरण
कऱ्हाड : पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी गावाने पात्र लाभार्थ्यांचे एकाच दिवशी शंभर टक्के लसीकरण केले. गावातील पात्र लाभार्थ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने जनजागृती करण्यात आली. आशा कर्मचारी आणि अंगणवाडी सेविका यांनी ४५ वर्षे वयापेक्षा जास्त असलेल्या वयाच्या ग्रामस्थांचा सर्व्हे करून नाव नोंदणी केली.