ताथवडे घाटात दरडी कोसळण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:45+5:302021-07-22T04:24:45+5:30

वाठार निंबाळकर ताथवडे (ता.फलटण) घाटातील दरडी कोसळण्याची भीती ताथवडे ग्रामस्थ व वाहन चालकांमध्ये आहे. फलटण पुसेगाव रस्त्यावरील ताथवडे या ...

Fear of landslides in Tathawade Ghat | ताथवडे घाटात दरडी कोसळण्याची भीती

ताथवडे घाटात दरडी कोसळण्याची भीती

Next

वाठार निंबाळकर

ताथवडे (ता.फलटण) घाटातील दरडी कोसळण्याची भीती ताथवडे ग्रामस्थ व वाहन चालकांमध्ये आहे. फलटण पुसेगाव रस्त्यावरील ताथवडे या सुमारे चार किलोमीटर घाट रस्त्यावर डोंगरावरून मोठमोठे दगड निसटून रस्त्यावर येत आहेत. सध्या या रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरण काम सुरू असून, अंतिम टप्प्यात आहे. रस्ता दुरुस्ती होत असल्याने, वाहन चालक व परिसरातील ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत असले, तरी अद्याप रस्त्याच्या कडेला कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. कठडे व संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे, ती तातडीने बांधण्यात यावी, ज्या-ज्या ठिकाणी घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे, असे दगड काढून टाकण्यात यावेत, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या घाटातील दरडी कोसळण्याच्या स्थितीबाबत ताथवडे येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत वाघ म्हणाले, सध्या घाटातील रस्ता दुरुस्ती सुरू असून, या कामामध्ये घाटातील ज्या दरडी कोसळण्याची शक्यता आहे, अशा दरडी तातडीने काढण्यात याव्यात. पाऊस पडल्यानंतर अचानक मोठे दगड डोंगरवरून रस्त्यावर पडतात. त्यामुळे मोठा अपघात होण्याबरोबरच दरडी कोसळून रस्ता वाहतूक बंद होईल. त्यामुळे प्लास्टर अथवा लोखंडी जाळी लावून आधीच उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे.

Web Title: Fear of landslides in Tathawade Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.