सातारा: 'ग्रेड सेपरेटर'चा शॉर्टकट ठरतोय जीवघेणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 02:32 PM2022-07-06T14:32:16+5:302022-07-06T14:32:41+5:30
ग्रेड सेपरेटर फक्त वाहनांसाठी असल्याने या रस्त्यावरून कोणी चालत जाणार नाही असा समज करून वेगवान वाहने या विद्यार्थ्यांना उडवून जाण्याची परिस्थिती आता येथे निर्माण झाली आहे.
सातारा : शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सातारा शहरातील मध्यवर्ती पोवई नाका येथे तयार केलेल्या ग्रेड सेपरेटर सध्या जीवघेणा ठरत आहे. महाविद्यालय सुटल्यानंतर या ग्रेड सेपरेटर मधून विद्यार्थी स्टॅन्डकडे जातात. ग्रेड सेपरेटर फक्त वाहनांसाठी असल्याने या रस्त्यावरून कोणी चालत जाणार नाही असा समज करून वेगवान वाहने या विद्यार्थ्यांना उडवून जाण्याची परिस्थिती आता येथे निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता असल्याने सुरू झाला तरीही येथून प्रवास करायला प्रवासी किंवा विद्यार्थी उपलब्ध नव्हते. कोरोनाचा धोका टळल्यानंतर महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली. महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी बऱ्याचदा घरी जाण्याचा मार्गावर मोबाईल मध्ये डोकं घालून जात असतात सेपरेटर. महाविद्यालयांकडे जाताना या ग्रेड सेपरेटरचा उपयोग विद्यार्थी करू लागले आहेत. महाविद्यालयातून तातडीने घरी जाण्याचा शॉर्टकट म्हणूनही या रस्त्याचा उपयोग मुलं करत आहेत ग्रेड सेपरेटर मधून जाणाऱ्या वाहनांना चालत जाणारी अचानक दिसल्याने किरकोळ अपघाताचे प्रकार येथे घडले आहेत हे प्रकार जीव घेणे होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ग्रेड सेपरेटर मधून न जाण्याचे आवाहन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्टॅण्डकडे जाण्यासाठी वर्दळ
महाविद्यालयात जाण्यासाठी आलेले विद्यार्थी कॉलेज सुटल्यानंतर जवळचा रस्ता म्हणून ग्रेडसेपरेटरचा आसरा घेतात. ग्रेड सेपरेटरमध्ये भल्या सकाळी फारशी वर्दळ नसल्याने स्टॅण्डपासून महाविद्यालय गाठण्यासाठी विद्यार्थी येथून जातात. पण महाविद्यालय सुटल्यानंतर ग्रेडसेपरेटरमधून प्रवास करणाºया वाहनांची वर्दळ वाढते. त्यातच विद्यार्थीही याच मार्गाने ये जा करत असल्याने अडचणींमध्ये वाढ होत आहे. वेगाने येणाºया वाहनांना ही मुलं न दिसल्याने अपघाताची शक्यताही आहे.
ग्रेडसेपरटेर निव्वळ वाहनांसाठीच!
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी साताऱ्यात ग्रेड सेपरेटरची निर्मिती झाली. शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांना स्टॅण्डकडे थेट जाण्यासाठी आणि शहरातून बाहेर पडण्यासाठी ग्रेड सेपरटेर वाहनचालकांसाठी उत्तम सोय आहे. हा रस्ता पदपथ नसल्याने त्याचा पायी चालण्यासाठी उपयोग करणे गैर आहे.
गत सप्ताहात ग्रेड सेपरेटर मधून जाताना अचानक विद्यार्थ्यांचा घोळका समोर दिसला. वाहनाचा वेग अधिक नसल्याने तातडीने ब्रेक दाबून गाडीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले आणि अपघात झाला नाही. मात्र गाडीचा वेग अधिक असतात तर अप्रिय घटना घडली असती याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. - राजेंद्र केंडे, शाहूपुरी