कोरेगावात रुग्ण वाढल्यामुळे धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:39 AM2021-04-16T04:39:55+5:302021-04-16T04:39:55+5:30
कोरेगावात सध्या २३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत; तर दोघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असून प्रशासनाची चिंताही वाढली आहे. गावातील ...
कोरेगावात सध्या २३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत; तर दोघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असून प्रशासनाची चिंताही वाढली आहे. गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. कडक निर्बंध अवलंबले जात आहेत. परिस्थिती गंभीर बनत असल्याने प्रशासनाने तातडीने गावातच लसीकरण मोहीम सुरू केली आहे. गावातील एक किराणा दुकानदार बाधित आढळल्याने ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी हादरून गेले आहेत. संबंधित दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या ग्रामस्थांची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सोमवारी (दि. १२) मंडलाधिकारी विनायक पाटील, तलाठी शेखर भोसले यांनी बाधित ठिकाणी भेट देऊन खबरदारीच्या सूचना केल्या. तसेच गावात कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे दोन दिवसांत शिबिर घेऊन गावातच चाचणी घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.