संताप.. दोन घोट अन् जीवनाचा खेळ खल्लास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:47 PM2017-08-30T23:47:20+5:302017-08-30T23:47:20+5:30

Fear of two ghats and life play! | संताप.. दोन घोट अन् जीवनाचा खेळ खल्लास !

संताप.. दोन घोट अन् जीवनाचा खेळ खल्लास !

Next



दत्ता यादव।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कुटुंबातील विसंवाद, अपेक्षाभंग अन् वाढत चाललेल्या बेकारीमुळे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६४ जणांनी स्वत:च्या जीवनाला कंटाळून विष घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विष प्राशन केलेल्यामध्ये बळीचे प्रमाण १४ असले तरी दिवसेंदिवस विष प्राशन करणाºयांचे प्रमाण वाढल्याने समाजासाठी हे घातक ठरत आहे.
आत्महत्या करणेही गुन्हा समजला जातो. मात्र, अगोदरच मानसिक संतुलन बिघडून जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस अशा व्यक्तींचा सहानुभूतीने विचार करतात. पुन्हा गुन्हा दाखल करून त्याला समस्येच्या गर्तेत टाकण्यापेक्षा त्याचे समुपदेशन केलेले बरे. असे समजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींवर गांभीर्याने गुन्हा दाखल केला जात नाही. मात्र, तरीही याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांची नोंदवही पाहिल्यानंतर समाजातील विदारक चित्र डोळ्यासमोर येते. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ६४ जणांनी विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील काहीजणांनी मृत्यूवर मात केली तर १४ जणांना मृत्यूने
कवटाळले.
विषारी औषध प्राशन केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले जाते. या ठिकाणी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा जबाब घेतला जातो. मात्र, या जबाबामध्ये खरे कारण पुढे येत नाही, हे पोलिसांनाही माहित असते. मात्र, जो रुग्ण सांगेल तो जबाब पोलिसांना घ्यावा लागतो. यातील बरेच जण चुकून तर काहीजण घरातल्यांना भीती दाखविण्यासाठी विषारी औषध घेतले असल्याचे सांगतात. तर काहीजण नोकरी आणि कौटुंबिक कलहातून जीवनाला कंटाळलेले असतात. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हे
प्रमाण वाढले असल्याचे पोलिसांच्या डायरीतून नोंदीवरून दिसून येत
आहे.
किटकनाशक किंवा झोपेच्या गोळ्या
शेतात फवारण्यासाठी आणि घरात झुरळांसाठी आणलेले किटकनाशक आत्महत्या करण्यासाठी प्राशन केले जाते. तसेच झोपेच्या जादा गोळ्याही घेतल्या जातात. मात्र, विषाचे प्रमाण जास्त झाल्यानंतरच मृत्यू होतो. रुग्णालयात तातडीने रुग्णाला आणल्यास यातून जीव वाचलेल्यांचे प्रमाण
जास्त आहे.

Web Title: Fear of two ghats and life play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.