गुप्तीचा धाक दाखवून युवकाकडून सव्वा लाखांचा ऐवज लुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 06:34 PM2021-03-05T18:34:09+5:302021-03-05T18:35:30+5:30
Crimenews Satara Police- सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघालेल्या तरूणाला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना दि .3 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विशाल उर्फ शूभम विश्वास यादव (रा.शिवथर, ता. सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सातारा: येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघालेल्या तरूणाला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना दि .3 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विशाल उर्फ शूभम विश्वास यादव (रा.शिवथर, ता. सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दि.3 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास यादव हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघाला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या 20 ते 22 वर्षीय वयोगटातील दोघांनी त्याला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील एक लाख 20 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन चेन जबरस्तीने चोरून पळ काढला.
यावेळी यादव त्याचा मित्र प्रणव साबळे यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने प्रणवच्या तोंडावर गुप्तीचा वार करून त्याला जखमी केले. तर यादवच्या दोन्ही हातावर वार करून त्यालाही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षल आंचल दलाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करत आहेत.