सासरच्या छळास कंटाळून विवाहेतची आत्महत्या: म्हसवडमध्ये गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 12:25 PM2020-05-08T12:25:56+5:302020-05-08T12:29:24+5:30

म्हसवड : मोबाईलचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून अर्धा तोळे सोने व तीन लाख रुपये घेऊन ये,ह्ण असे म्हणून सासरच्या मंडळींकडून ...

Fed up with the persecution of her father-in-law, she committed suicide | सासरच्या छळास कंटाळून विवाहेतची आत्महत्या: म्हसवडमध्ये गुन्हा

सासरच्या छळास कंटाळून विवाहेतची आत्महत्या: म्हसवडमध्ये गुन्हा

Next
ठळक मुद्देसासरच्या छळास कंटाळून विवाहेतची आत्महत्या: म्हसवडमध्ये गुन्हामोबाईल दुकानासाठी माहेरुन तीन लाख आणण्याची मागणी

म्हसवड : मोबाईलचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून अर्धा तोळे सोने व तीन लाख रुपये घेऊन ये,ह्ण असे म्हणून सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ केला जात होता. त्याला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या ेकेली.

खळबळजणक ही घटना माण तालुक्यात भालवडी येथे घडली. आसमा अस्लम मुलाणी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, आसमा अस्लम मुलाणी (वय २३, रा. भालवडी) या विवाहितेस नवऱ्याला मोबाईल दुकान टाकण्यासाठी तीन लाख रुपये व लग्नात ठरलेले अर्धा तोळे सोने माहेरून घेऊन ये, यासाठी सतत जाचहाट केला जात होता. या त्रासाला कंटाळून विवाहिता आसमा मुलाणी हिने गुरुवारी पहाटे भालवडी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी नवरा असलम, सासरा जाफर दादाभाई मुलाणी, सासू अफसाना, दुसरी सासू अमजद जाफर मुलाणी यांच्याविरुद्ध सूरज शिकंदर शेख (रा. लवंग, ता. माळशिरस) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे तपास करत आहेत.

Web Title: Fed up with the persecution of her father-in-law, she committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.