चारा मुबलक; दुष्काळी भागात घेऊन जा; बामणोली भागातील शेतकऱ्यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 10:50 PM2018-11-18T22:50:50+5:302018-11-18T22:51:08+5:30
लक्ष्मण गोरे । लोकमत न्यूज नेटवर्क बामणोली : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने बामणोली भागातील डोंगररांगातील चारा सुकू लागला ...
लक्ष्मण गोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बामणोली : यावर्षी परतीचा पाऊस झाला नसल्याने बामणोली भागातील डोंगररांगातील चारा सुकू लागला आहे. यामुळे शेतकºयांनी यावर्षी लवकरच गवत कापणीस सुरुवात केली आहे. तर यंदाही या भागात चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, दुष्काळी भागालाही येथील चाºयाचा उपयोग होऊ शकतो. कापून राहिलेले गवत नेण्याचे आवाहनही येथील शेतकºयांनीही केले आहे. त्यादृष्टीने विचार करण्याची गरज आहे.
जावळी तालुक्यातील बामणोली भागातील शेतकरी शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय करतात. संपूर्ण उन्हाळा व पावसाळ्यातील दोन महिन्यांसाठी शेतकरी गवत कापून त्याच्या गंजी लावून ठेवतात. हा चारा जनावरांसाठी खाद्य म्हणून महत्त्वाचा ठरतो. तर येथील पश्चिमेकडे डोंगररांगा तीव्र उताराच्या आहेत. दिवसभर डोंगरात जाऊन गवत कापणे अत्यंत अवघड व कष्टाचे काम असते. अनेक शेतकरी सौदे व मजुरीनेही गवत कापणी करतात. सध्या या परिसरातील अनेकजण मुंबईला नोकरी, व्यवसाय करत असल्यामुळे पशुधन खूपच कमी झाले आहे. त्यामुळे गवताची कमी प्रमाणात कापणी होते. तर सध्या डोंगरातील गवत मात्र दरवर्षीप्रमाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
सध्या शेतकरी अत्यंत कमी प्रमाणात गवत कापणी करणार आहेत. त्यामुळे शिल्लक चारा थोड्या दिवसांनी वणव्यात जळून खाक होणार आहे. या चाºयाचा कोणालाही फायदा होणार नाही. वणवा लागणार नाही, यासाठी काही पावले उचलली तर चारा वाचू शकतो. तसेच या चाºयाचा दुष्काळी भागातील जनावरांना फायदा होऊ शकतो. यासाठी सर्वांनी आतापासूनच सावधगिरी बाळगली पाहिजे. येथील चारा दुष्काळी भागातील जनावरांपर्यंत कसा पोहोचेल, यासाठी नियोजन आवश्यक ठरणार आहे.
सह्याद्रीच्या डोंगरामध्ये मुबलक चारा: रोजगाराची संधी
सह्याद्रीच्या डोंगरामध्ये मुबलक चारा उपलब्ध आहे. स्थानिक शेतकºयांची गरज भागून उरलेला चारानंतर वणव्यात जळून भस्मसात होतो.
शिल्लक चाºयाचा वणव्यापासून बचाव केला तर दुष्काळी भागाला याचा खूपच फायदा होईल. तसेच स्थानिक शेतकºयांना याच गवत कापणीतून रोजगारही मिळले. यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे.