‘बदली हवी’च्या मागणीसाठी शिक्षकांचे साताºयात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:24 PM2017-11-20T23:24:17+5:302017-11-21T00:06:22+5:30
सातारा : शासनाने २७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार शिक्षकांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी ‘बदली हवी’ मागणी करणाºया शिक्षकांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे साखळी उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बुधवारपासून जिल्ह्यातील १ हजार शिक्षक एकत्रितपणे उपोषण सुरू करणार आहेत, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हे शिक्षक गैरसोयीच्या ठिकाणी काम करीत आहेत. शासनाने आॅनलाईन बदलीचा निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिला. मात्र त्यांना बदल्या दिल्या गेलेल्या नाहीत. साखळी उपोषणाचा सोमवारी पहिला दिवस होता.
त्यानंतर मंगळवारीही उपोषण सुरू राहणार आहे.
सोमवारी अरविंद अवसरे, राजेश धनावडे, प्रदीप कुंभार, आनंदराव फरांदे, संजय वाघमारे, राजेश धनावडे, खंडेराव काळे, प्रवीण क्षीरसागर, मनीषा भिंगारदेवे, महादेव जाधव, अल्ताफ मणेर, महेश धुमाळ, वैभव देवकर, भाऊसाहेब जाधवर, कृष्णात कुंभार, अनिल कांबळे, सचिन राऊत, मयूर खाडे, विकास दिवटे, समीर नेवसे, सागर कांबळे, गजानन वारागडे, ज्ञानेवर चव्हाण, चंद्रकांत अडसूळ, मंजुषा थोरात आदी शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते. आता बुधवारपासून होणाºया उपोषणाकडे लक्ष लागले आहे.