एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग, साताऱ्यातील घटना

By दत्ता यादव | Published: February 22, 2024 12:48 PM2024-02-22T12:48:16+5:302024-02-22T12:48:44+5:30

सातारा : एकतर्फी प्रेमातून महिला डाॅक्टरचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा ...

Female doctor kidnapped and raped due to one-sided love, incident in Satara | एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग, साताऱ्यातील घटना

एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग, साताऱ्यातील घटना

सातारा : एकतर्फी प्रेमातून महिला डाॅक्टरचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडल्याचे समोर आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

अनुप नंदकुमार गाडे (वय ३८, रा. हॅपी होम सोसायटी, एमआयडीसी, सातारा), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला डाॅक्टर या ३२ वर्षांच्या असून, त्या साताऱ्यातील एका हाॅस्पिटलमध्ये काम करतात. संशयित अनुप गाडे याने एकतर्फी प्रेमातून महिला डाॅक्टरला वारंवार फोन केला. तसेच प्रत्यक्ष भेटून त्यांना जबरदस्तीने त्याच्या कारमध्ये बसविले. त्यानंतर त्याने शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. ‘फोनवर बोलली नाहीस. माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या घरातील लोकांना जीवंत सोडणार नाही. घर पेटवून देईन,’ अशी धमकी दिली. 

हा प्रकार १२ डिसेंबर २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत साताऱ्यातील एका हाॅस्पिटलसमोर घडला आहे. दरम्यान, पीडित महिला डाॅक्टरने बुधवार, दि. २१ रोजी सायंकाळी पावणेचार वाजता सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित अनुप गाडे याच्यावर अपहरणसह विनयभंगचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Female doctor kidnapped and raped due to one-sided love, incident in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.