विघ्नहर्त्याच्या उत्सवात ३९ विघ्नकर्ते तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 11:48 PM2017-08-30T23:48:41+5:302017-08-30T23:48:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : गणेशोत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी विविध गुन्हे दाखल असलेल्या ३९ जणांना सातारा शहरातून तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीचे आदेश मिळाल्यापासून गणेशोत्सव संपेपर्यंत संबंधित ३९ जणांना शहराबाहेर राहावे लागणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी विविध गुन्हे दाखल असलेल्या संशयितांची यादी तयार केली. या लोकांकडून गणेशोत्सवामध्ये कायदा व सुवस्था बिघडून शांततेचा
भंग होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे संबंधितांना सातारा श्ांहर, शाहूपुरी पोलिस ठाणे आणि सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत
येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
अशा लोकांकडून विशेषत: मिरवणुकीमध्ये गोंधळ घातला जातो. त्यामुळे पोलिसांनी यंदा विशेष करून खबरदारी घेतली आहे. तिन्हीही पोलिस ठाण्यांनी तडीपारीचे प्रस्ताव तयार करून उपविभागीय पोलिस अधिकारी खंडेराव धरणे यांच्याकडे पाठविला होता. यावर धरणे यांनी नुकताच निर्णय दिला असून, संबंधित ३९ जणांना ६ सप्टेंबरपर्यंत साताºयात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
या लोकांना गणेश मिरवणुकीमध्ये सहभागी होण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
मनोज चंद्रकांत घाडगे (रा. बुधवार नाका, परिसर), गणेश दादा थोरात (रा. मंगळवार पेठ, सातारा), अर्षद राजू बागवान (यादोगोपाळ पेठ, सातारा), सागर बापू सूर्यवंशी (रा. बुधवार नाका, परिसर), धनंजय मुकुंद साळुंखे (रा. बुधवार नाका, सातारा), सुदर्शन उर्फ बल्ल्या राजू गायकवाड (बुधवार नाका, सातारा), किरण अनिल कुºहाडे (एकता कॉलनी, करंजे, सातारा), सूरज उर्फ भैय्या अशोक चौगुले (मंगळवार पेठ, सातारा), अमर श्रीरंग आवळे, किरण शंकर आवळे (बुधवार पेठ, परिस), अनिल महालिंग कस्तुरे (भैरोबा मंदिराजवळ, करंजे सातारा), सुजित उर्फ गुन्या सदाशिव आवळे (रा. बुधवार पेठ, सातारा), गुरुप्रसाद शेखर साठे (रा. गडकर आळी, सातारा), राजू रामदास नलावडे, विजय राजू नलावडे, राहुल रामचंद्र करवले, शिवाजी बापू अहिवळे, सूरज वसंत पवार, प्रदीप दीपक पवार (सर्व रा. मंगळवार पेठ, सातारा), अतुल आनंदराव चव्हाण (रा. कंरजे सातारा), धीरज जयसिंग ढाणे (चिमणपूरा पेठ) या २१जणांना शाहूपुरी पोलिसांनी तडीपार केले आहे.
अजय देवराम राठोड (लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी, सातारा), प्रशांत सर्जेराव किर्तीकुडाव (कोडोली, सातारा), चेतन प्रदीप सोळंकी (सदर बझार, सातारा), रवी राजेंद्र सोळंकी, चेतन लालासाहेब पवार (दोघेही रा. रविवार पेठ), विजय रामचंद्र अवघडे (मातंगवस्ती, कोडोली सातारा), संजय एकनाथ माने, संकेत दिनेश राजे (भिमाबाई आंबेडकर, झोपडपट्टी, सदर बझार, सातारा), अमोल बबन जाधव, योगेश दत्तात्रय शिंदे (शनिवार पेठ, तेलीखड्डा सातारा) या १० जणांना सातारा शहर पोलिसांनी तडीपार केले आहे.
राहुल अंकुश गंगावणे, सुजाता राहुल गंगावणे (रा. परळी, ता. सातारा), बाळू मारुती सावंत, सुनील काळू माने, अप्पा उर्फ शिरीष शिवराम साळुंखे (सर्व रा. लिंब, ता. सातारा), दिनकर गणपत वाघ (रा. देगाव, ता. सातारा), तुषार शंकर कापसे (रा. माळ्याची वाडी, पो. कण्हेर, ता. सातारा), वैभव गुलाबराव फाळके (रा. सैदापूर, ता. सातारा) या आठजणांना सातारा तालुका पोलिसांनी तडीपार केले आहे.
या ३९ जणांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी साध्या वेशातील पोलिसही तैनात केले आहेत. अनेकदा अशा लोकांना तडीपारीचे आदेश देऊन हे लोक घरातच राहत असतात. मात्र, यावेळी पोलिसांनी त्यांच्या घरात आणि परसिरात जाऊन लोकांना त्यांच्याबद्दल माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून हे लोक गणेशोत्सवामध्ये साताºयात थांबणार नाहीत. याचा पोलिसांनी बंदोबस्त केला आहे. तडीपार करण्यात आलेल्या काहीजणांवर खून, दरोडा, मारामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.