कामावरून काढून टाकल्याच्या रागातून फायबर बोटी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:33+5:302021-07-02T04:26:33+5:30

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या गाभा क्षेत्रामध्ये वन्यजीव विभागाच्या फायबर बोटी जाळून नष्ट करून साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी ...

Fiber boats burned out of anger at being fired from work | कामावरून काढून टाकल्याच्या रागातून फायबर बोटी जाळल्या

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून फायबर बोटी जाळल्या

Next

सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या गाभा क्षेत्रामध्ये वन्यजीव विभागाच्या फायबर बोटी जाळून नष्ट करून साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी वनाधिकाऱ्यांनी पूर्वाश्रमीच्या वन मजुराला वन्यजीव कायद्यांतर्गत अटक केली. कामावरून कमी केल्याच्या रागातून त्याने हा प्रकार केला असल्याचे समजते.

अविनाश गोविंद जाधव (रा. आकल्पे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात कर्मचाऱ्यांना गस्तीसाठी तसेच त्यांच्या संरक्षणासाठी संरक्षक कुटी उभारण्यात आल्या आहेत. व्याघ्र प्रकल्पाच्या म्हाळुंगे नियतक्षेत्रात म्हाळुंगेवाडी येथे असलेल्या संरक्षक कुटीमधील साहित्याची अज्ञाताने मोडतोड केली असल्याचा प्रकार निदर्शनास आला. तसेच काही साहित्याची चोरी झाली असल्याचेही निदर्शनास आले.

चोरट्याने वन्यजीव विभागाच्या फायबरची बोट जाळून नुकसान केले असल्याचेही दिसून आले. चोरट्याने संरक्षक कुटीची तोडफोड केली. डिझेल इंजिन, पाण्याची पाइपलाइन, वायरलेस बेस स्टेशन, भांडी, खुर्च्या, सोलर पॅनल आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वन्यजीव विभागाचे बामणोली येथील वनक्षेत्रपाल हसबनीस यांनी मेढा पोलिसांच्या मदतीने अधिक तपास करून चोवीस तासांत अविनाश जाधव याला अटक केली. पोलिसांनी चोरीस गेलेल्यापैकी २ बॅटरी, सोलर पॅनेल, टाॅर्च आदी साहित्य संशयित‍ाच्या घरातून हस्तगत केले. जाधवने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जाधव हा वन्यजीव विभागात यापूर्वी वनमजूर म्हणून काही काळ कार्यरत होता. कामावरून कमी केल्याच्या रागातून त्याने नशेत हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Fiber boats burned out of anger at being fired from work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.