रहिमतपुरात कोरोनाला रोखण्यासाठी फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:28 AM2021-06-01T04:28:56+5:302021-06-01T04:28:56+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. २५८ रुग्णांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू ...

Fielding to stop Corona at Rahimatpur | रहिमतपुरात कोरोनाला रोखण्यासाठी फिल्डिंग

रहिमतपुरात कोरोनाला रोखण्यासाठी फिल्डिंग

googlenewsNext

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूरमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. २५८ रुग्णांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. काही गल्ली अन् वस्ती ठिकाणी घेतलेल्या तपासणी शिबिरातून तब्बल शतकांनी बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे.

रहिमतपूरमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असली तरी योग्य ती काळजी घेतल्यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. लॉकडाउन कालावधीमध्ये बाधितांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच आहे. शंकास्पद वाटणाऱ्या वस्तीमध्ये नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. एका शिबिरामध्ये ३१८ लोकांच्या अहवालमध्ये १०२ बाधित सापडले. एकदम शतकाने वाढ झाल्याचे समोर आल्याने पालिका पदाधिकारी व प्रशासकीय यंत्रणा चक्रावून गेली आहे. तपासणी शिबिरासह क्रीडा संकुलामध्ये शंकास्पद वाटणाऱ्यांसाठी दररोज तपासणी केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने प्रचंड प्रयत्न केले जात आहेत. शहरातील तीन शाळांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. होम आयसोलेशनमध्ये सोयीसुविधांचा अभाव आणि सोशल डिस्टन्स राहत नसल्यामुळे संसर्गात वाढ होत आहे. त्यामुळे होम आयसोलेशन बंद करून बाधितांना विलगीकरण कक्षात ठेवले जात आहे. या ठिकाणी योग्य औषध उपचाराबरोबरच दिवसभरातील नाष्टा पाण्यासह जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. अनेक दानशूर विलगीकरण कक्षातील बाधितांच्या आहारासाठी सढळ हाताने मदत करत आहेत. कोरेगाव प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्यासह इतर अधिकारी संसर्ग रोखण्यासाठी रहिमतपूर पालिकेत वारंवार भेट देत आहेत. पालिका पदाधिकारी, अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचा सपाटा लावला आहे.

(चौकट)

जिथे कमी तिथे आम्ही...

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील कोविड सेंटर व रहिमतपूर येथील शाळेमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्यासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. परंतु दानशूरांकडून मिळालेल्या मदतीपेक्षा जास्त खर्च झाल्यास ‘जिथे कमी तिथे आम्ही’ या उक्तीप्रमाणे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, नगराध्यक्ष आनंदा कोरे, माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांच्यासह पालिका पदाधिकारी पुढे सरसावत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी सर्व स्तरांतून सर्व बाजूंनी सातत्याने निकराचे प्रयत्न केले जात आहेत.

फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) नगरपरिषदेमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्याबरोबर बैठक पार पडली. (छाया : जयदीप जाधव)

Web Title: Fielding to stop Corona at Rahimatpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.