खटाव पूर्व भागात पंधरा सिमेंट बंधारे मंजूर : येळगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:38 PM2017-07-19T13:38:55+5:302017-07-19T13:38:55+5:30
पाणी पातळी वाढण्यास मदत
आॅनलाईन लोकमत
मायणी (जि. सातारा), दि. १९ : खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावासाठी २९६ लाख ६८ हजार किमतीचे १५ बंधारे सिमेंट व काँक्रीट बंधारा मंजूर झाले असून, यामध्ये ४२३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होणार आहे, अशी माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दिली.
खटाव पूर्व भागात मजूर झालेल्या या बंधारे व नालाबांध मुळे जमिनीतील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. कान्हरवाडी, ता. खटाव येथील नंदू पाटील वस्ती व जाधव मळा १८ लाख ८८ हजार किमतीचे दोन बंधारे, मायणी, ता. खटाव येथील चांद नदीवर किमतीचे ९लाख ३ हजार (फुलेनगर) , ३४ लाख ३४ हजार, (कलेढोण रस्ता), २९ लाख ९३ हजार (गुदगे शेत), ३४ लाख ८१ हजार(दगडी रस्ता) असे चार बंधारे तसेच कलेढोण, ता. खटाव येथे ३४ लाख ४२ हजार, (दबडे मळा) किंमत २० लाख ३३ हजार, (साळुंखे मळा ) १७ लाख ५८ हजार,(साळुंखे मळा पूर्व ) असे चार बंधारे, २५ लाख ९४ हजार, कान्हरवाडी (जाधव मळा) ११ लाख ४७ हजार, गारुडी १३ लाख ४८ हजार,गारुडी (बेलदरा ) १३ लाख १२ हजार तर गारळेवाडी १८ लाख ७१ हजार व १६ लाख ६४ हजार असे दोन बंधारे असे एकूण १५ सिमेंट बंधारे व नालाबांध मंजूर झाल्यामुळे परिसारतील कलेढोण, मायणी, गारळेवाडी, गारुडी, कान्हरवाडी आदी गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे, असे माजी आमदार दिलीप येळगावकर यांनी दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे.