पंधरा कुटुंबीयांनी शोधला कचरा संकलनाचा नवा मार्ग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:10 AM2019-12-20T00:10:35+5:302019-12-20T00:11:31+5:30
प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश कुलकर्णी या तरुणाच्या मनात आला.
सातारा : घंटागाडी दारात येऊनही साताऱ्यातील अनेक नागरिक आजही रस्त्यावर कचरा टाकण्यात धन्यता मानतात. परंतु शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे पंधरा कुटुंबीय याला अपवाद ठरले आहे. येथील रहिवाशांनी अपार्टमेंटमध्येच कचरा संकलनाची व्यवस्था केली असून, याठिकाणी प्लास्किट कचरा, ई-कचरा व भंगार साहित्य वेगवेगळे गोळा केले जाते. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, त्याचे अनुकरण आता इतर नागरिकही करू लागले आहेत.
प्लास्टिक कच-यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जैवविविधता धोक्यात आली आहे. सातारा शहरातही असेच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, असा विचार यादोगापाळ पेठेतील आदी रेसिडेन्सीमध्ये राहणाºया हृषीकेश कुलकर्णी या तरुणाच्या मनात आला.
याचवेळी त्याच्या वाचनात कचरा संकलनाचे काम करणा-या एका तरुणाचा लेखही आला होता. त्यातून प्रेरणा घेऊन हृषीकेशने कचरा संकलनाचे काम सुरू केले. तत्पूर्वी त्याने या नव्या उपक्रमाची अपार्टमेंटमधील रहिवाशांना कल्पना दिली. सर्वांचा होकार मिळताच त्याने पौर्णिमा शहा व आई ऋुता मिलिंद कुलकर्णी यांच्या मदतीने कचरा संकलनाचे काम सुरू केले.
नियोजनानुसार प्लास्टिक, ई-कचरा व भंगार साहित्य वेगवेगळे गोळा केले जाऊ लागले. यासाठी अपार्टमेंटच्या तिसºया मजल्यावर तीन मोठे डबे ठेवण्यात आले आहेत. तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून, सर्वात खालच्या मजल्यावर राहणारे नागरिकही नित्यनेमाने आपला कचरा या डब्यांमध्येच टाकतात.
संकलित होणाºया कच-यापैकी ई-कचरा हा प्रा. संध्या चौगुले यांनी ‘हिरवाई’त सुरू केलेल्या ई-कचरा संकलन
केंद्रात पाठविला जातो. तर प्लास्टिक कच-याचे गठ्ठे तयार करून तो पुण्याला रिसायकलिंगसाठी पाठविला जातो. आतापर्यंत २०० किलो प्लास्टिक हे रिसायकलिंगसाठी पाठविण्यात आले आहे. या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर अनेक कुटुंबांनी आता पर्यावरणपूरक चळवळ सुरू केली आहे.
सातारा शहर स्वच्छ व सुंदर राहावे, पर्यावरणाचे संवर्धन व्हावे, यासाठी आम्ही कचरा संकलनाचा उपक्रम हाती घेतला. नागरिकांचा या पर्यावरणपूरक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची जाणीव आता झाली आहे.
- हृषीकेश कुलकर्णी, सातारा
पर्यावरणाचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. पर्यावरणाचे महत्त्व ओळखून आम्ही अपार्टमेंटमध्ये कचरा संकलन केंद्र सुरू केले. तीन वर्षांत आम्ही दोनशे किलो प्लास्टिक समुद्राच्या पोटात जाण्यापासून रोखूू शकलो. आमचा हा उपक्रम पुढे सुरूच राहणार आहे.
- पौर्णिमा शहा, सातारा
साताऱ्यातील आदी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी अपार्टमेंटमध्येच कचरा संकलन केंद्र सुरू केले असून, वेगवेगळ्या डब्यात कचरा संकलित केला जातो.