पंधरा गुंठ्यात ४२ टन ऊस!
By admin | Published: February 11, 2015 09:29 PM2015-02-11T21:29:42+5:302015-02-12T00:37:49+5:30
कोपर्डे हवेलीतील शेतकऱ्याने वाढत्या उत्पादनखर्चावर केली मात
कोपडे हवेली : दिवसेंदिवस ऊस उत्पादनाचा खर्च वाढत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशातच कोपर्डे हवेली येथील शेतकरी संदीप चव्हाण यांनी १५ गुंठे जमीन क्षेत्रामध्ये ४१ टन एवढे उसाचे उत्पादन घेतले आहे. ऊस शेतीचा उत्पादन खर्च कमी करताना संदीप चव्हाण यांनी मर्यादितच रासायनिक खतांचा वापर केला. १५ गुंठे क्षेत्राला तीनट्रेलर शेणखत घालून शेत जमिनीची मेहनत केली. तीन फुटी सरीमध्ये दीड फुटांच्या अंतराने ८६०३२ जातीच्या बियाण्याची एकच उसाच्या डोळ्यांची लागण केली. १५ दिवसांच्या अंतराने सरीने पाणी दिले. जमीन उसाचे पीक जोमदार आल्याने त्याची उंची वाढली. उसाला एकाच वेळी भांगलण केली. उसाचा पाला काढला नसल्याने तणाची उगवण झाली नाही. सरासरी गुंठ्याला दोन टन आठशे किलोचा उतारा मिळाला. पारंपरिक शेती करून चांगले उत्पादन घेता येते, असा आदर्श संदीप चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या समोर ठेवला. परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. (वार्ताहर)
कमी क्षेत्रात जास्त उत्पादन हाच पर्याय
साखरेला बाजारपेठेत योग्य मागणी नसल्याने साखरेचे दर ढासळत आहेत. त्यामुळे साखर कारखाने योग्य दर देत नाहीत. तर ऊस उत्पादन खर्च वाढत असल्याने उसाची शेती अडचणीत सापडली आहे. त्यासाठी उत्पादन खर्च करून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणे हाच शेतकऱ्यांच्या समोर सध्या योग्य पर्याय आहे.
रासायनिक खतांच्या शेणखताचा वापर केल्यास त्याचा फायदा तीन वर्षे होतो. शिवाय पीक चांगले येऊन उत्पादन खर्चात बचत होेते.
-संदीप चव्हाण, शेतकरी
रासायनिक खतांच्या शेणखताचा वापर केल्यास त्याचा फायदा तीन वर्षे होतो. शिवाय पीक चांगले येऊन उत्पादन खर्चात बचत होेते.
-संदीप चव्हाण, शेतकरी