गुजरातमधील विद्यार्थ्यांची पाचगणीत फसवणूक

By admin | Published: January 3, 2016 10:02 PM2016-01-03T22:02:38+5:302016-01-04T00:51:37+5:30

दांडेघर टोलनाका : १३० विद्यार्थ्यांकडून आकारले २ ऐवजी २० रुपये

Fifty-fifth student fraud in Gujarat | गुजरातमधील विद्यार्थ्यांची पाचगणीत फसवणूक

गुजरातमधील विद्यार्थ्यांची पाचगणीत फसवणूक

Next

महाबळेश्वर : पाचगणी येथील दांडेघर टोलनाक्यावर पर्यटकांची राजरोसपणे लूट केली जात आहे. जिल्ह्यातील कोणताही जबाबदार अधिकारी या लुटीची दखल घेत नसल्याने टोलनाक्याच्या ठेकेदाराची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी गुजरात राज्यातील सहा सहलींच्या बसेसमधील १३० विद्यार्थ्यांकडून २ रुपयांऐवजी २० रुपये असे एकूण ३ हजार रुपये वसूल केले; परंतु शिवसैनिकांनी ठेकेदाराचा मनसुबा उधळून लावला व तीन हजार रुपये ठेकेदारास परत करण्यास भाग पाडले.
गुजरात राज्यातील म्हैसाणा येथील शैक्षणिक सहलीच्या सहा बसेस महाबळेश्वर येथे सहलीसाठी पाचगणी येथून येत होत्या. या सर्व बसेस दांडेघर येथे टोलसाठी थांबविण्यात आल्या, हे सर्व विद्यार्थी महाबळेश्वरला निघाले होते. त्यामुळे पाचगणी येथे प्रवासी कर देण्याची आवश्यकता नव्हती. याठिकाणी केवळ बसेसचा बायपासचा कर देणे आवश्यक होते. जरी हे विद्यार्थी पाचगणी फिरणार असले तरी त्यांना केवळ २ रुपये कर आहे; परंतु खासगी ठेकेदाराने प्रत्येक विद्यार्थ्यांकडून २ रुपयांऐवजी सरळ २० रुपयांप्रमाणे टोल वसूल केला. १३० विद्यार्थ्यांचे २,६०० व सहा बसेसचे ७० रुपयांप्रमाणे ४२० असे एकूण ३,०२० रुपये ठेकेदाराने घेतले. परराज्यातील ही मंडळी असल्याने कर किती आहे, याची त्यांना पुसटशीही कल्पना नाही. मागतील तेवढा कर भरून ही सर्व मंडळी महाबळेश्वर येथील टोलनाक्यावर आली. महाबळेश्वर येथील टोलनाक्यावर जेव्हा त्यांच्याकडे टोलची मागणी केली, तेव्हा त्यांनी पाचगणी येथे टोल भरल्याचा पावत्या दाखविल्या. याच ठिकाणाहून शिवसेनेचे विभाग प्रमुख शंकर ढेबे हे निघाले होते. त्यांनी गर्दी पाहून चौकशी केली असता, हा लुटीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
त्यांनी काही शिक्षक व बसचालकांना घेऊन पाचगणी येथील दांडेघर टोलनाक्यावर आले. याठिकाणी गोंधळ पाहून टोलनाक्यावर गर्दी झाली काहींनी या संदर्भात पाचगणी पोलिसांना कळविले. पाचगणी येथील शिवसेनेचे शहर प्रमुख संजय कासुर्डे, माजी तालुका प्रमुख अजित कासुर्डे हे शिवसैनिकांसह तेथे धावून आले. व एकच गोंधळ सुरू झाला. आपली चोरी पकडली गेली या कल्पनेनेच ठेकेदाराचा पारा चढला होता. अखेर ठेकेदाराने रुद्रावतापुढे बेकायदेशीर वसूल केलेले ३,०२० ही रक्कम सहलीच्या शिक्षकांना परत
केली. (प्रतिनिधी)


पालिका कर्मचाऱ्याला दमदाटी; फलकही फाडला
महाबळेश्वरच्या नावावर दांडेघर नाक्यावर बेकायदेशीर टोल वसूल करून पर्यटकांची फसणूक केली जाते. अशा तक्रारीची दखल घेऊन महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी आपला एक कर्मचारी तेथे पाहणी करण्यासाठी पाठविला असतात त्या कर्मचाऱ्यास दमदाटी देऊन हाकलून लावण्यात आले. फलक लावला तर तोही फाडून टाकण्यात आला.

Web Title: Fifty-fifth student fraud in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.