पन्नाशीतील महिलांकडून दहावीचा ‘सेकंड चान्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:50 PM2018-03-07T23:50:52+5:302018-03-07T23:50:52+5:30

सातारा : जिल्ह्यातील १०४ महिलांनी ‘सेकंड चान्स’ घेतल्याचे वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या भुवया साहजिकच उंचावल्या असतील; पण खरंय, परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावे लागलेल्या महिलांनी लग्न, मुलं, नातवंडं झाल्यानंतर दहावी पूर्ण

 Fifty-three women in Class X's 'Second Chance' | पन्नाशीतील महिलांकडून दहावीचा ‘सेकंड चान्स’

पन्नाशीतील महिलांकडून दहावीचा ‘सेकंड चान्स’

Next
ठळक मुद्देघरकाम सांभाळून १०४ महिला परीक्षेला : इच्छा असतानाही परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागले; घरी बसून टॅबवरून अभ्यास

जगदीश कोष्टी ।
सातारा : जिल्ह्यातील १०४ महिलांनी ‘सेकंड चान्स’ घेतल्याचे वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या भुवया साहजिकच उंचावल्या असतील; पण खरंय, परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावे लागलेल्या महिलांनी लग्न, मुलं, नातवंडं झाल्यानंतर दहावी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत त्या परीक्षा देत आहेत.

‘मुली शिकून काय करणार?’ असा विचार करून काहींच्या आई-वडिलांनी त्यांना घरी बसवलेलं होतं. तर काहींच्या बाबतीत पालकांचे छत्र हरपलेलं भावंडांची जबाबदारी अंगावर आली. त्यामुळे काम करण्यासाठी त्यांना शाळा सोडावी लागली. त्यामुळे इच्छा असूनही अनेकींना शाळा मधूनच सोडावी लागले. अशाच महिलांसाठी प्रथम शिक्षण संस्थेने शिक्षणाची पुन्हा संधी उपलब्ध करून दिली. प्रथम शिक्षण संस्थेची साताºयात शाखा आहे. या संस्थेंतर्गत ‘सेकंड चान्स प्रोग्राम’ हा उपक्रम राबविला जातो.

सातारा जिल्ह्यात सात वर्षांपासून सुरू असलेल्या या केंद्रात १६ ते ४८ वयोगटातील १०४ महिलांनी यंदा प्रवेश घेतला आहे. या संस्थेचा ९२ टक्के निकाल लागला आहे. प्रथम येणारी महिला सरासरी पन्नास ते साठ टक्के गुण मिळवत आहे.त्यांच्यातील काहीजणी गृहिणी आहेत. कोण धुणी-भांडी करत्यात तर कोण मजुरी करून संसार करत आहेत. काहींना नातवंडे झाले आहेत; पण शिक्षणाच्या ओढीने त्यांनी पुन्हा शिकण्याचा निर्णय घेतला.

सर्वसाधारणपणे पाचवीच्या पुढे शिक्षण सोडलेल्या असल्यास त्यांना थेट दहावीला प्रवेश दिला जातो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सतरा नंबरचा फॉर्म भरला जातो अन् दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. दहावीची परीक्षा
पास होऊन काहीजणी एखाद्या व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत.

‘शाळा सोडून अनेक वर्षे झाली असल्याने त्यांना शिकवणे तितकेच गरजेचे आहे. हे ओळखून त्यांच्यासाठी संस्थेतर्फे दररोज शाळा भरविली जाते. गोडोलीत ही शाळा आहे. या ठिकाणी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच वर्ग, बाकडे अन् फळा असतो. सर्व विषय शिकविले जातात. तज्ज्ञांकडून दहावीनंतर पुढे काय? या विषयावर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे,’ अशी माहिती केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.


उशिरा आल्या तरीही सवलत...
सर्वसाधारण शाळेत उशिरा आल्यास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षा केल्या जातात. दहावीचं वर्ष महत्त्वाचे असल्याने मुलांना उशीर होऊ नये म्हणून पालकच विशेष काळजी घेतात. येथे येणाºया विद्यार्थिनीही या आई, आजी आहेत. त्यांच्यावर संसाराची जबाबदारी असते. ती सांभाळून येत असताना अनेकींना उशीर होतो; पण सवलतही दिली जाते.

भांडणं कमी.. समजूतदारपणाच जास्त
दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये नोट्स देण्यावरून किंवा कोणत्याही किरकोळ कारणावरून भांडणं नेहमीच होतात. अनेकदा मुख्याध्यापकांपर्यंत तक्रार जाते. पालकांना बोलवावे लागते; पण येथे येणाºया विद्यार्थिनींमध्ये कमालीचा समजूतदारपणा जाणवतो. कोणी आजारी असतील तर एकमेकींना नोट्स देतात. गृहपाठ पूर्ण करून देतात.

प्रथम शिक्षण संस्थेने साताºयात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेंतर्गत ‘सेकंड चान्स प्रोग्राम’ हा उपक्रम राबविला जात आहे.
 

प्रथम शिक्षण संस्थेच्या सेकंड चान्स उपक्रमात येणाºया महिलांसाठी पारंपरिक पद्धतीने शिकवले जात असले तरी पाच-सहा जणींचा गट करून टॅब घरी दिले आहेत. त्या घरी बसून टॅबवरून अभ्यास करतात.
- कांचन नलावडे, शिक्षिका

Web Title:  Fifty-three women in Class X's 'Second Chance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.