बोरगावमध्ये सहकार-संस्थापक यांच्यातच लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:48 AM2021-06-09T04:48:56+5:302021-06-09T04:48:56+5:30
बोरगाव : कृष्णा कारखान्याच्या रणसंग्रामाचे बोरगाव (ता. वाळवा) येथील चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी सहकार पॅनल व संस्थापक पॅनल ...
बोरगाव : कृष्णा कारखान्याच्या रणसंग्रामाचे बोरगाव (ता. वाळवा) येथील चित्र स्पष्ट झाले आहे. सत्ताधारी सहकार पॅनल व संस्थापक पॅनल यांच्यातच काटा लढत होणार हे निश्चित झाले आहे.
रयत पॅनलचे इच्छुक उमेदवार विलास शिंदे यांचा अर्ज अवैध ठरला आहे. त्यामुळे रयतकडे आता तगडा उमेदवारच कोणी उरला नाही. सहकार पॅनलकडून जितेंद्र पाटील एकमेव असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित आहे, तर संस्थापक पॅनलकडून माजी संचालक उदयसिंह शिंदे व मानाजी पाटील यांच्यातील तिढा कायम आहे. दोघांनाही माघार मान्य नाही. यावर अविनाश मोहिते यांनी त्यांच्या उमेदवारीचा चेंडू या दोघांबरोबर गावातील प्रमुखांच्या कोर्टात सोपवला आहे. या तिन्ही इच्छुकांनी संपर्क दौऱ्यांच्या आजअखेर तीन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत.
रेठरेहरणाक्षमध्ये यापेक्षा उलट चित्र आहे. येथे इच्छुकांची गर्दी आहे. तरीही सहकार पॅनलचे जे. डी. मोरे, संस्थापक पॅनलचे केदार शिंदे, रयत पॅनलचे विश्वास ऊर्फ दिलीप मोरे हे तिघेही उमेदवारी निश्चित समजून सभासदांच्या गाठीभेटीत व्यस्त झाले आहेत. उमेदवारीचे चित्र हे १७ जूनला स्पष्ट होणार असले तरी बोरगाव व रेठरेहरणाक्षमधील इच्छुकांनी उमेदवारी निश्चित समजून घरात जाऊन गाठीभेटीवर भर दिला आहे.
चाैकट
बंडाची चर्चा
बोरगावात कोणालाही उमेदवारी मिळाली तरी बंड होणार नाही. रेठरेहरणाक्षमध्ये तिन्ही पॅनलमधून बंडोबा पुढे येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क