‘प्लेट’वरचे आकडे गूल; ‘नंबर’ कहाँ है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:12 AM2018-05-21T00:12:12+5:302018-05-21T00:12:12+5:30

The figures on the plate Where is 'number'? | ‘प्लेट’वरचे आकडे गूल; ‘नंबर’ कहाँ है?

‘प्लेट’वरचे आकडे गूल; ‘नंबर’ कहाँ है?

Next

संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : प्रत्येक वाहनाला ‘आरटीओ’चा नोंदणी क्रमांक असतोच; पण सध्या विनानंबरची शेकडो वाहने रस्त्यावरून धावतायत. संबंधित वाहनांवर ‘प्लेट’ लटकलेली असते. त्यावर पुसटसा नंबरही दिसत असतो. मात्र, तो नंबर नेमका किती, हे कोणीच सांगू शकत नाही. गाडी चकाचक ठेवण्यावर वाहनधारक जेवढा भर देतात तेवढे ते नंबरबाबत गंभीर नसल्याचेच यावरून दिसून येते.
कºहाड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने गत काही दिवसांपासून खराब नंबरप्लेट असलेल्या वाहनांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत तीनच दिवसांत तब्बल अडीचशे वाहनांवर कारवाई झाली. गत वर्षभराचा विचार करता अशा प्रकारची कारवाई झालेल्या वाहनांची संख्या अडीच हजारांपेक्षाही जास्त आहे. त्यावरून वाहनधारक नंबरप्लेटबाबत जागरूक नसल्याचे दिसून येते. खराब नंबर प्लेटबरोबरच फॅन्सी प्लेटवरही पोलिसांचा वॉच आहे. फॅन्सी प्लेट असलेल्या वाहनांवरही पोलीस कारवाई करीत असून, गत वर्षभरात अशा शेकडो वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
नंबरप्लेटबाबत अनेक नियम आहेत़ रिक्षा, प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीच्या वाहनांसाठी पिवळ्या रंगावर काळ्या रंगात क्रमांक लिहिलेला असावा, असा नियम आहे़ दुचाकी वाहनांसाठी पांढऱ्या रंगावर काळ्या रंगात अक्षरे लिहिणे बंधनकारक आहे़ वाहनाच्या पुढील व मागील नंबरप्लेटची उंची, आकार, रंग केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार निश्चित करून देण्यात आला आहे़ दुचाकी वाहनांसाठी १५ एमएम व चारचाकी वाहनांसाठी २५ एमएम आकाराची नंबरप्लेट सक्तीची आहे़ अंक, त्याची उंची, रुंदी व दोन आकड्यांमधील अंतरसुद्धा ठरवून देण्यात आले आहे; पण जे वाहनधारक नंबरबाबतच गंभीर नाहीत ते प्लेटच्या नियमाबाबत किती जागरुक असतील, याचा विचार न केलेलाच बरा.
शहरातील रस्त्यावरून सध्या नंबरप्लेट खराब असणारी शेकडो वाहने धावताना दिसतात. काही वाहनांच्या प्लेटवरील नंबरचा रंग उडालेला असतो. तर काही वाहनांची प्लेट निम्म्यातून मोडलेली असते. काहीजण तर विनानंबरची वाहने बिनदिक्कतपणे दामटताना दिसतात. अशा वाहनधारकास वाहतूक पोलिसांनी अडवले तर त्वरित नंबर टाकून घेण्याचे तो मान्य करतो. मात्र, त्यानंतरही अनेकजण नंबर टाकून घेण्याची तसदी घेत नाहीत.
प्लेट शंभरची; दंड भरतात दोनशे
कोणत्याही वाहनासोबत नंबरप्लेट मिळतेच. त्या प्लेटवर फक्त नंबर टाकण्याचा खर्च वाहनधारकाला करावा लागतो. हा खर्चही शंभर ते दीडशे रुपयांपर्यंत असतो. रेडीअममध्ये नंबर टाकायचा झाल्यास तो खर्च थोडाफार वाढतो. मात्र, अनेक वाहनधारक नंबरसाठीचा हा खर्च टाळतात. ज्यामुळे त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. पोलीस खराब नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकास दोनशे रुपये दंड करतात. असाच दंड दोन ते तीनवेळा भरावा लागल्यास वाहनधारकाला नाहक चारशे ते सहाशे रुपयांचा फटका बसतो.
‘फॅन्सी‘ प्लेटची वाढती ‘क्रेझ’
दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनधारकांमधील ‘फॅन्सी’ नंबप्लेटची ‘के्रझ’ सध्या भलतीच वाढली आहे. रस्त्यावर धावणाºया वाहनांपैकी अनेक वाहनांच्या नंबरप्लेटवर आकड्यांच्या माध्यमातून शब्द तयार करण्यात आल्याचे दिसून येते़ हे शब्द तयार करतानाही दादा, मामा, भाऊ, तात्या, आबा, बाबा अशी पडनावं किंवा पाटील, पवार अशी आडनावं साकारली जातात़ अशी नंबर प्लेट असलेल्या वाहनाला हजार रुपये दंड केला जातो.
चार दिवसांत दीड लाख वसूल
कºहाड शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने गत चार दिवस शहरात कारवाईची विशेष मोहीम राबविली. कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप चौक, भेदा चौक, दत्त चौक, कर्मवीर चौक, विजय दिवस चौक, कृष्णा नाका यासह अन्य ठिकाणी पोलिसांनी साडेसहाशे वाहनांवर कारवाई केली. त्यामध्ये अवैध प्रवासी वाहने १०, खराब नंबरप्लेटच्या २६३, ट्रीपल सीट ४ यासह इतर ३३४ वाहनांवर कारवाई करून १ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: The figures on the plate Where is 'number'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.