पीसीपीएनडीटीप्रकरणी गुन्हा दाखल करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 09:10 PM2018-12-12T21:10:39+5:302018-12-12T21:12:25+5:30
कोणत्याही स्वरुपाची वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा गर्भलिंग तपासणी व मशीन बाळगून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाथा खाडे याच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे
सातारा : कोणत्याही स्वरुपाची वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा गर्भलिंग तपासणी व मशीन बाळगून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाथा खाडे याच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत.
केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात खुलेआम गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाºया नाथा सहदेव खाडे (रा. पिंपरी, ता. माण) याला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह पकडले. पोलीस तपासामध्ये नाथा खाडे हा मोटारसायकलवर गर्भलिंग मशीन घेऊन गावोगावी फिरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तक्रारदारच मिळत नव्हते. म्हणून त्याच्यावर गुन्हाच दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे नाईलाजस्व त्याला सोडून देण्यात आले होते. हे वृत्त सर्वात प्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.
त्यानंतर पोलिसांनी पंचनाम्यासाठी तातडीने जप्त केलेली मशीन औंध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांना दिली. त्यांनी ते मशीन घेतले; मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून पोलिसांनी हे मशीन दबाव टाकून माझ्याकडे दिल्याचे कळवले. वैद्यकीय अधिकाºयांनी पोलिसांना अपेक्षित असलेला अहवाल दिला. मात्र, गुन्हा कोणी दाखल करायचा, यावरून पोलीस आणि वैद्यकीय अधिकाºयांमध्ये तू तू-मैं मैं झाली. अखेर आरोग्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना नाथा खाडेवर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
एलसीबी मशीनची माहिती कशी देणार
जिल्हाधिकाºयांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, नाथा खाडे याने मशीन कोठून आणले, ते कोणाकडून खरेदी केले, त्याअगोदर ती कोणाकडे होती, तसेच या मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले आहे काय? याबाबतचा अहवाल स्थानिक गुन्हे शाखेककडून प्राप्त करून घ्यावा. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने नाथाला अटकच न केल्याने त्याच्याकडे पुरेशी चौकशीच झाली नाही.
संबंधितावर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे औंध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. लवकरच गुन्हा दाखल होईल.
अमोद गडीकर-जिल्हा शल्यचिकित्सक