नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:24+5:302021-04-16T04:40:24+5:30

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथे कोरोनाच्या काळातील नियमांचे उल्लंघन करीत दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी ...

Filing of offenses against shopkeepers who break the rules | नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल

नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हा दाखल

Next

मायणी : खटाव तालुक्यातील मायणी येथे कोरोनाच्या काळातील नियमांचे उल्लंघन करीत दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सातजणांवर गुन्हा नोंद केला आहे.

याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, शासनाने पारित केलेल्या नियमाप्रमाणे मायणी येथे सध्या लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. फक्त अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या आस्थापना उघड्या ठेवण्यास परवानगी आहे. परंतु, बंद आस्थापनांत समावेश असतानाही या परिसरातील तीन पानशॉप, एक हॉटेल, मराठी शाळेजवळील एक कापड दुकान, बसस्थानकाच्या परिसरातील एक चप्पल दुकान व चावडी चौक परिसरातील एक कापड दुकान चालू असलेले आढळले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. वडूज पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी हे तपास करीत आहेत.

Web Title: Filing of offenses against shopkeepers who break the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.