नमुने पोेर्टलवर भरा, अन्यथा कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:47+5:302021-06-25T04:27:47+5:30

सातारा : सातारा जिल्ह्यात शासकीय व खासगी कोविड रॅपिड अँटिजन टेस्ट तपासणी केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. ...

Fill out the samples on the portal, otherwise take action | नमुने पोेर्टलवर भरा, अन्यथा कारवाई

नमुने पोेर्टलवर भरा, अन्यथा कारवाई

googlenewsNext

सातारा : सातारा जिल्ह्यात शासकीय व खासगी कोविड रॅपिड अँटिजन टेस्ट तपासणी केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. या तपासणी केंद्रामध्ये तपासणीसाठी आलेल्या संशयित रुग्णांचे नमुने घेतले जातात. या सर्व रुग्णांची शासकीय पोर्टलवर दैनंदिन ऑनलाइन नोंद केली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.

बऱ्याच ठिकाणी संशयित रुग्णांना तोंडी किंवा त्यांच्या लेटरहेडवर लेखी स्वरूपात रॅपिड अँटिजन टेस्ट रिपोर्ट दिले जात असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांची ऑनलाइन पोर्टलवर विहित मुदतीत नोंद केली जात नसल्यामुळे जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद येथे रिपोर्टिंग करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. या बाबी प्रशासकीय दृष्ट्या गंभीर स्वरूपाच्या असल्याने सर्व खासगी लॅब संस्थांनी त्यांच्याकडे होणाऱ्या रॅपिड टेस्टचे रिपोर्ट देताना रुग्णांची ऑनलाइन पोर्टलवर नोंद करून आयसीएमआर आयडी तयार केल्याशिवाय संबंधितांना रिपोर्ट देण्यात येऊ नयेत. जे खासगी लॅबधारक रॅपिड टेस्टचे रिपोर्ट आयसीएमआरच्या पोर्टलवरून डाऊनलोड करुन न देता त्यांचे स्वत:च्या लॅबच्या लेटरपॅडवर अथवा अन्य मार्गाने रिपोर्ट संबंधितांना दिल्याचे आढळल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथरोग कायदा १८८७ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येऊन संबंधित लॅब सिल करून परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

Web Title: Fill out the samples on the portal, otherwise take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.