उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:25 AM2021-06-19T04:25:46+5:302021-06-19T04:25:46+5:30
येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून कऱ्हाडसह पाटण, कडेगाव आणि वाळवा तालुक्यातील गोरगरीब रुग्ण औषधोपचार घेतात. विभागातील नागरिकांच्या दृष्टीने हे ...
येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून कऱ्हाडसह पाटण, कडेगाव आणि वाळवा तालुक्यातील गोरगरीब रुग्ण औषधोपचार घेतात. विभागातील नागरिकांच्या दृष्टीने हे रुग्णालय महत्त्वाचे आहे. मात्र तरीही या रुग्णालयात आवश्यक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व तज्ज्ञांची पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. रुग्णालयात फिजिशियन, आर्थाेपेडिया, भूलतज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत शल्यचिकित्सक, नेत्रचिकित्सक यांसह सेविका, परिचारिका, रेडिओलॉजिस्ट आदी अनेक पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी यापूर्वी आंदोलन व उपोषणही करण्यात आले होते. त्या वेळी आमरण उपोषण सोडताना उपसंचालक डॉ. संजय देशमुख यांनी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले होते. उपजिल्हा रुग्णालयात खास बाब म्हणून ट्राॅमा केअर स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. उपजिल्हा रुग्णालयातील सिटीस्कॅन, सोनोग्राफीचे मशीन बंद आहे. ‘बर्न वॉर्ड’चे बांधकाम अपुरे आहे. या सोयीसुविधा तातडीने कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.