सातारा - लोणंद रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:11+5:302021-05-28T04:28:11+5:30

शिवथर : सातारा ते लोणंद रस्त्यावर आरफळ फाट्यानजीक पडलेल्या खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध होताच पाच दिवसात संबंधित विभागाने येथील खड्डे ...

Filling of potholes on Satara-Lonand road | सातारा - लोणंद रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम

सातारा - लोणंद रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम

Next

शिवथर : सातारा ते लोणंद रस्त्यावर आरफळ फाट्यानजीक पडलेल्या खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध होताच पाच दिवसात संबंधित विभागाने येथील खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याने वाहनचालक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दिनांक १९ मे रोजी ‘लोकमत’मध्ये आरफळ फाट्यानजीक पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. यावेळी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मागील दिवस पुढे येतात की काय, असे वाटले होते. सातारा ते लोणंद तसेच फलटण रस्त्याला जवळजवळ ७० ते ८० गावे व वाड्या-वस्त्या आहेत. या गावातील लोकांचा संपर्क कोणत्या ना कोणत्या कारणाने सातारा शहराशी येत असतो. यावेळी या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागतो. परंतु, पहिल्याच वळिवाच्या पावसाने या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांमध्ये नाराजी होती. परंतु, या खड्ड्यांची बातमी प्रसिद्ध होताच संबंधित ठेकेदारांनी याची दखल घेत पाच दिवसात खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतल्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी तसेच वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Filling of potholes on Satara-Lonand road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.